कल्पतरू उसाला लई भारी, उतारा पडणार नाही कमी अन बेणे प्रक्रिया, सप्तामृत फवारल्यावर गोडी व उत्पन्नाची हमीच हमी

श्री. ज्ञानेश्वर पंढरीनाथ वांजळे,
मु.पो. करंजी, ता. शिरूर, जि. पुणे,
मोबा. ९०४९०६८०८९


एकूण २७ एकर क्षेत्र आहे. यामध्ये १२ एकर ऊस आहे. यातील अर्ध्या एकर उसाला प्रयोगादाखल २५ किलो कल्पतरू खत सरीतून दिले होते. त्यावेळी ३ महिन्याचा ऊस असताना ३ फणी आखणी केल्यावर हे खत दिले होते. तर इतर ११.५ एकर उसाच्यामानाने याची जोमाने वाढ झाल्याचे जाणवले. फुटवादेखील जादा होता. त्या साऱ्यांमधील उसाच्या कांड्यात वाढ झाली. तो ऊस ४२ कांड्यापर्यंत वाढून जाडीदेखील वाढली होती. या उसाला काळोखी भरपूर होती. सर्व ऊस एकावेळी कारखान्याला गेल्याने ६५ टनाचा उतार मिळाला. औषध फवारणीस मजूर मिळत नाहीत. आम्ही पुण्यामध्ये राहतो. त्यामुळे आतापर्यंत औषधे वापरली नाहीत. फक्त खत देतो. तर कल्पतरूचा अप्रतिम रिझल्ट मिळाला आहे.

त्या अनुभवातून आता मध्यप्रदेशची व्ही. एन. आर. बी. व्ही. या व्हरायटीच्या पेरूची १०० रोपे आणि राहुरी कृषी विद्यापीठाच्या सरदार पेरूची ४०० रोपे मागविली आहेत. ही एन. आर. बी. व्ही. ची रोपे १३० रू. प्रमाणे मिळाली. त्याला ३ वर्षात फळे लागतात. याचे एक फळ १ ते १।। किलोचे भरते. सरदाराची ४० रू. प्रमाणे रोपे मिळाली. दोन्ही रोपे जागेवरून आणावी लागणार आहेत. तेव्हा या पेरूसाठी आज कल्पतरू सेंद्रिय खताच्या ८ बॅगा घेऊन जात आहे. जमीन काळी चांगली आहे. पाणी २ विहिरींचे आहे. आमच्या जवळून चास - कमान कॅनॉल गेला असल्याने विहीरींना पाणी भरपूर आहे. पेरूला ठिबक करणार आहे.

रोपे १५ जुलै २०१५ ला आणणार आहे. त्यावेळी रोपे लागवडीसाठी जर्मिनेटर व फवारणीला सप्तामृत घेऊन जाणार आहे.

भुईमूग, स्वीटकॉर्न, बाजरी, सोयाबीन यांना फक्त रासायनिक खते वापरतो. फवारणी कोणतीच करीत नाही. आता या पिकांनाही कल्पतरू सेंद्रिय खत वापरणार आहे.