१० गुंठे भेंडीपासून १ लाख २० हजार

श्री. रमेशराव उत्तमराव फरकाडे,
मु.पो. मांडवा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती - ४४४९०४.
मो. ७२७९४४०९७३


मी सर्वप्रथम फेब्रुवारी २०१६ ला भुईमुगाकरीता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरली. कंपनीचे प्रतिनिधी सुजित भजभुजे (९६६५२९०४९५) यांच्याशी माझी जानेवारी महिन्यात भेट झाली. त्यावेळेस कपाशीच्या फरदडसाठी भेट घेतली होती, पण वातावरण कपाशीसाठी पोषक नसल्यामुळे मी कपाशी काढून टाकण्याचा निर्णय घेतला. मग मी त्यांच्याकडून भुईमुगाचे नियोजन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने बीजप्रक्रिया पासून ते काढणीपर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच वापरले. म्हणून एकरी १३ पोते म्हणजे (१३ क्विंटल) भुईमूग झाला. यावरून मी भेंडीवर सुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरण्याचे ठरविले.

१ एप्रिल २०१६ ला मी १० गुंठे भेंडी लावली. सुरुवातीला शेतात मी दोन ट्रॉली शेणखत विस्कटून दिले नंतर j.k.Seed चे ७३१५ ह्या जातीचे भेंडी बी लावले. सोबत सुरुवातीला १ बॅग १०:२६:२६ खत वापरले. बीजप्रक्रियेसाठी जर्मिनेटर वापरले. त्यामुळे ३ ते ४ दिवसांनी भेंडी दिसू लागली. ९६ ते ९८% भेंडीचे बी उगवले होते. त्यानंतर १० ते १५ दिवसांनी त्यावर मी जर्मिनेटर ५० मिली + प्रिझम ५० मिली + थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली/पंप याप्रमाणे वापरले. त्याने हलक्या प्रमाणात मर रोग जाणवत होता तो नाहीसा झाला. भेंडीला तुषार सिंचनाने पाणी दिले. नंतर १ महिन्यानंतर १०:२६:२६ व युरीया १ - १ बॅग मिक्स करून दिले. एवढ्यावर भेंडीची उंची झपाट्याने वाढू लागली. पिकाची निरोगी वाढ होण्यासाठी मी दुसऱ्या फवारणीमध्ये प्रिझम ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली + थ्राईवर ६० मिली + न्युट्राटोन ५० मिली + राईपनर ६० मिली १५ लि. पंपास घेऊन फवारले. यामध्ये लिहोसीन वापरले. प्रिझममुळे भेंडीला फुट व फुलांची संख्या वाढली.

२२ मे पासून भेंडीची तोडणी करायला सुरुवात केली. पहिल्या तोडणीला ८० किलो भेंडी निघाली. चांदूर रेल्वे येथे रविवारी बाजारात ४० रु./किलोने भेंडी विकली.

त्यानंतर मी दर ८ - १० दिवसांनी प्रिझम ७५ मिली + थ्राईवर ७५ मिली + न्युट्राटोन ७५ मिली + राईपनर ७५ मिली + क्रॉपशाईनर ७५ मिली + १५ लि. पाण्याच्या पंपामधून फवारत गेलो. दर २ ते ३ दिवसांनी भेंडीची तोडणी करत असे. सोमवारला फुलगाव, बुधवारला धामणगाव आणि रविवारला चांदूर रेल्वे अशा ३ ही बाजारात मी भेंडी विकली. ४० ते ५० रु./ किलो प्रमाणे मला भाव मिळला.

हुमणी, पांढरी माशी, मावा, तुडतुड्यांसाठी एक नवा प्रयोग

मध्यंतरी हुमणी (White Grub) या किडीने भेंडीची काही झाडे दगावली. त्यासाठी आम्ही आपले घरगुती मीठ आणि जर्मिनेटर + प्रोटेक्टंटचे द्रावण तयार करून जमिनीतून दिले असता याचा सुद्धा प्रादुर्भाव कमी झाला. पांढरी माशी, मावा, तुडतुडे याकरीता स्प्लेंडर वापरले. सुरूवातीला ८० ते १०० किलो भेंडी निघत होती. नंतर तिचे प्रमाण वाढून ११० ते १३० किलो पर्यंत गेले.

मला साधारणतः आतापर्यंत १,२०,०००/- रुपयांचे भेंडीचे उत्पन्न झाले असून भेंडीचे उत्पादन अजून देखील सुरू आहे. या भेंडीचे उत्पादन महालक्ष्मी पर्यंत मला मिळत राहील असा अंदाज आहे. भजभुजे यांच्या मार्गदर्शनामुळे मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा चांगला अनुभव आला. भेंडीवर शेवटपर्यंत कोणत्याही प्रकारचा व्हायरस दिसला नाही. यापुर्वी दरवर्षी भेंडीवर यलो व्हेन मोझॅकचा प्रादुर्भाव दिसतो. यावर्षी तो मला दिसला नाही. भेंडीला शाईनिंग पण चांगली होती. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीलासुद्धा मला चांगला भाव मिळाला. इतरांच्या तुलनेत भेंडी सरळ, कोवळी आणि एकसारखी निघाली. नाहीतर ती वेडी - वाकडी पण येत असते. त्याचे प्रमाण फार कमी होते.

अशाप्रकारे या टेक्नॉलॉजीमुळे मला फायदा झाला. मी कपाशी बियासाठी १ लि. पाण्यामध्ये ५० मिली जर्मिनेटर घेऊन त्यामध्ये बियाणे ३ तास भिजवून नंतर सुकवून डोबले (लावले), तर १०० % फुलीवर कपाशीची उगवण झाली आहे. त्यावर मी आता पहिली फवारणी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची करणार आहे.