ज्येष्ठ कृषी शाश्त्रज्ञ प्रा. डॉ. वि. सु. बावसकर यांना वसंतराव नाईक - कृषि साहित्य पुरस्कार


कृषी तंत्रज्ञान विषयात गेली ३० वर्षपासून देत असलेल्या योगदानाबद्दल डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी(अॅग्रो) प्रा. लि. चे संस्थापक चेअरमन ज्येष्ठ कृषि शास्त्रज्ञ प्रा. डॉ. वि. सु. बावसकर यांना वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानचा वसंतनराव नाईक कृषि साहित्य पुरस्कार - २०१७ मुंबई येथे वसंतराव नाईक यांच्या १०४ व्या जन्मदिवशी दि. १ जुलै २०१७ रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री मा.ना. श्री. पांडूरंग फुंडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, डॉ. बी. आर. बारवाले. कार्याध्यक्ष अविनाश नाईक यांच्यासह आदी मान्यवर पुरस्कर्ते उपस्थित होते.

गेल्या ४० वर्षाच्या संशोधनातून प्रा. डॉ. बावसकर यांनी शेतकऱ्यांना नुसते दर्जेदार उत्पादनच नव्हे तर विषमुक्त अन्नधान्य फळे, फुले, भाजीपाला निर्मितीस उपयुक्त अशी पीक संरक्षके निर्माण करून त्याचा देशभरच्या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष प्रयोग, अवलंब होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून मानव जातीस विषमुक्त अन्नातून कुपोषणमुक्त होऊन सुद्दढ आरोग्य लाभण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे व अशी ही वाटचाल चालू आहे.

डॉ. बावसकर तंत्रज्ञानाने पॉलिहाऊसमधील खर्चीक पिकेदेखील खुल्या जमिनीत पॉलीहाऊसपेक्षा श्रेष्ठ आल्याने अत्यंत कमी खर्चात अधिक व दर्जेदार उत्पादन मिळाल्याने बाजारपेठेमध्ये उत्पादक शेतकऱ्यांना प्रचलित भावापेक्षा १०% हून अधिक भाव मिळत आहेत. असेच विविध व्यापारी व अपारंपरिक १०० हून अधिक पिकांचे देखील सौम्य प्रतिकूल परिस्थितीत अतिशय उत्तमरित्या उत्पादन व अधिक भाव घेतल्याचे हजारो शेतकऱ्यांनी, तज्ञांनी, शाश्त्रज्ञांनी अनुभवले आहे. त्यांच्या यशोगाथा आम्ही 'कृषी विज्ञान' मासिक व विविध विषयावर पुस्तकांतून १८ वर्षापासून प्रसारित केल्या आहेत. तसेच (www.drbawasakar.com) या वेबसाईटवर आहेत. 'पहाट' हे सदर युट्यूबवर या वेबसाईटवर असून आजपर्यंत ४५ पुष्प झाली आहेत. तसेच 'Dawn of LIfe' या सदराला देश - परदेशात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या २० वर्षामध्ये 'कृषी विज्ञान' च्या २५ लाख मासिकांमधून व द्राक्ष, डाळींब, केळी, पपई, शेवगा, संत्री - मोसंबी - लिंबू, आले, हळद, ऊस, कापूस, टोमॅटो कृषि मार्गदर्शिका अशा विविध पिकांच्या ३ लाखाहून अधिक पुस्तकांमधून शेतकऱ्यांना ज्ञान प्रबोधन करण्याचा संदेश देशभरातील महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल, काश्मिर येथील २५ ते ३० कोटी जनतेपर्यंत पोहचला आहे.