२० गुंठे मिरची अति उष्णतेतही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने रोज १ टन, खोडवाही उत्तम

श्री. प्रशांत गणपत पालेकर,
मु.पो. इंदोली,ता. कराड, जि. सातारा.
मो. ९९६०३१९४३८


आम्ही ट्रॉपीका - १०७४ या जातीच्या मिरचीची रोपे गेल्यावर्षी १५ फेब्रुवारी २०१६ रोजी २० गुंठ्यामद्ये लावली होती. जमीन माध्यम प्रतीची असून ३ फुट रुंदीच्या बेडवर मल्चिंग पेपरचे अच्छादन करून त्यावर १।। - १।। फुटावर ही मिरची लावली होती. २ बेडमध्ये २ फुटाचे अंतर होते. अशा पद्धतीने ५' x १।।' असे झाडांतील अंतर ठेवले.

१५ एप्रिल २०१६ ला ही मिरची चालू झाली. पहिला तोडा ५०० किलोचा निघाला. नंतर ७०० किलोचे ३ तोडे झाले. मात्र यादरम्यान (१० एप्रिल २०१६ पासून) तापमानात प्रचंड वाढ होऊन ४२ डी. ते ४३ डी. वर पारा गेल्याने त्याचा मिरचीवर दुष्परिणाम होऊ लागला. मिरचीवर व्हायरस, आकसा, बोकड्याचा प्रादुर्भाव होऊन अधिक तापमानाने फुल टिकेना, लहान मालही गळू लागला. फळधारणा पुर्णपणे बंद होऊन तोडे थांबले, अशा परिस्थितीत काय करावे समजेना. खर्च तर बराच झाला होता.

डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा ५ - ६ वर्षापुर्वी आले पिकावर वापर केला होता. त्याचा उत्तमप्रकारे रिझल्ट मिळाला होता. मात्र प्रत्येकवेळी पुण्यावरून औषधे आणून वापरणे शक्य नव्हते व जवळपास डिलरकडेही औषधे मिळत नव्हती. त्यामुळे मध्यंतरी खंड पडला.

रोग बरा होऊन रोज १ टन मिरची

आता मात्र पर्याय नव्हत म्हणून पुणे ऑफिसला फोन करून मिरची पिकाची परिस्थिती सांगून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांची माहिती घेतली. यावेळी मला तेथून सातारा जिल्ह्याचे कंपनी प्रतिनिधी दिपक खळदे (मो. ७३५०८६६८७३) यांची माहिती मिळाली. त्यानंतर ते आमच्या प्लॉटवर येऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार थ्राईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनी आणि अक्ट्रा या औषधांची फवारणी केली. फवारणीनंतर २ - ३ दिवसातच मिरची पिकावरील बोकड्या, आकसा रोग कमी होत असल्याचे जाणवले व पाने रूंद, हिरवी होऊन नवीन फुट सुरू झाली.

त्यानंतर प्रतिनिधींनी सप्तामृतची दुसरी फवारणी करण्यासाठी औषधे उपलब्ध करून दिली. त्यामुळे पुर्ण प्लॉटचा फुटवा वाढून पानांना काळोखी आली. नवीन फुलकळी देखील निघू लागली. त्यानंतर ८ - १० दिवसांनी पुन्हा सप्तामृताची तिसरी फवारणी केली असता १५ मे २०१६ ला बंद झालेली मिरची २० जून २०१६ ला पुन्हा चालू झाली. पहिलाच तोडा (२० जुनाच) १ टन मिळाला. मालाला आकर्षक हिरवा - पोपटी रंग व चमक येऊ लागली. दररोज तोडा करत होतो. कधी - कधी पुर्ण क्षेत्राची तोडणी दिवसभरात (माणसांअभावी) उरकली नाही की, ६०० ते ७०० किलो माल तोडला जात असे आणि दुसऱ्या दिवशी मात्र १४०० ते १६०० किलो माल निघत होता.

बेळगावच्या मिरचीपेक्षा उत्तम व्यापारी बागेत येऊन जागेवरून ६० रु. किलोने नेत, नंतर ७० रु. ने नेऊ लागले

कराड, उंब्रजचे व्यापारी घरी येऊन जागेवरून सुरुवातीला ६० रु./किलोने नेत असत. नंतर भाव वाढल्यामुळे ७० रु. ने जागेवरून जाऊ लागली. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित फवारण्या घेत असल्याने मिरचीला आकर्षक चमक होती. बाजारात बेळगावची मिरची विक्रीस येत होती. त्या मिरचीच्या शेजारी आपली मिरची ओतली असता गिऱ्हाईक प्रथम आपल्या मिरचकडे आकर्षित होत असे.

डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने खोडवाही

ह्या मिरचीचा बहार जुलै २०१६ मध्ये संपत आल्याने त्या मल्चिंगवर काकडी लावणार होतो. मात्र बहार संपत आहे असे वाटत असतानांच खालून नवीन फुट जोमाने निघाली. मग डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने याचाच खोडवा घेतला. त्याचे उत्पादन चालू होईपर्यंत ऑगस्ट २०१६ मध्ये काकडी बी टोकले. ही खोडवा मिरची ऑगस्ट २०१६ अखेर चालली. तिचेही चांगले पैसे झाले.

८ गुंठे भेंडी २। महिन्यात १।। टन, उत्पन्न ४० हजार

या मिरचीला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या घेत असताना माझ्याकडील भेंडी व मोगऱ्यालादेखील याचा वापर केला. भेंडी ८ गुंठ्यात १५ एप्रिल २०१६ ला लावली होती. भेंडीला नियमित डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या असल्याने १ जून २०१६ ला चालू झाली. दररोज तोडा करीत होतो. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या सप्तामृत फवारण्यांमुळे मालाला आकर्षक चमक व काळोखी होती. त्यामुळे उंब्रजचे व्यापारी ३० रु./किलो प्रमाणे भेंडी घेत होते. ८ गुंठ्यातून दररोज २० ते २५ किलो माल निघत होतो. २ - २। महिन्यात (८ ऑगस्ट २०१६ पर्यंत) १।। टन माल निघून ४० हजार रु. झाले .

मोगऱ्याचेही पैसे चांगले झाले

३ वर्षापुर्वी १।। एकरमध्ये ६' x २' वर मोगरा लावला आहे. तो जून २०१६ ला चालू झाला. दररोज १५ - १६ किलो मोगरा निघत होता. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या या अनुभवातून २ फवारण्या केल्या. तर कळी वाढून दररोज २० ते २५ किलो मोगरा निघू लागला. हा मोगरा दादर मार्केटला पाठवितो.

त्यानंतर ४ एप्रिल २०१७ ला ३ री फवारणी थ्राईवर १०० मिली + क्रॉपशाईनर १०० मिली + न्युट्राटोन १०० मिली + राईपनर ८० मिली + २० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यानंतर पाट पाणी दिले. मात्र उष्णता खूप असल्याने पुन्हा तुषार सिंचनाचा वापर केला. त्यानंतर प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे एकरी १.५ लि. राईपनर व १ लि. न्युट्राटोन हे पंपाचे नोझल काढून २४ एप्रिल २०१७ ला शेवटची फवारणी केली. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे पाण्याचे नियोजन केले. १८ मे नंतर पाणी करून २२ मे पासून भुईमूग सोंगण्यास (काढण्यास) सुरुवात केली. सरासरी २० ते २५ शेंगा प्रत्येक झाडास आढळल्या. २५ मे ला काढणी पुर्ण झाली. २ दाणी व ३ दाणी शेंगाचे प्रमाणे जास्त होते. दाणे टच्चा भरले होते. मला पावणेतीन एकरातून २५ क्विंटल भुईमूग झाला तसेच जवळपास १९ हजार रु. चे फुटारसुद्धा मिळाले. ते घरच्या जनावरांसाठी वारपले.