ढोबळी २० गुंठे खर्च ५० हजार उत्पन्न २।। लाख केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे

श्री. हिम्मतराव वाढेकर,
मु.पो. कवठा, ता.जि. जालना.
मो. ९५२७९७४७३३


आम्ही इंद्रा वाणाची ढोबळी मिरची ऑगस्ट २०१६ मध्ये बेडवर २० गुंठ्यात लावली होती. ३।। फुट रूंदीच्या बेडवर जोड ओळ लावून २ रोपात १।। फुट अंतर ठेवले. एकूण २६ ओळी होत्या. मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीबद्दल बरेच ऐकले होते. मात्र स्वतः वापरले नवहते. तेव्हा मी या मिरचीमधील ६ ओळीला सुरुवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर सुरू ठेवला आणि बाकी २० ओळींना नेहमीप्रमाणे खते औषधे फवारण्या करत होते. हे प्लॉट सप्टेंबर अखेरीस सुरू झाले. मात्र यामध्ये मला प्रचंड तफावर जाणवली. कारण आठवड्याला तोडे करत होतो तर जो २० ओळीमध्ये तोड्याला १५० किलो माल निघत होता तो मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरलेल्या ६ ओळीमध्येच मिळत होता. म्हणजे ६ ओळी व २० ओळीमधील उत्पादन सारखेच होते. अशा तऱ्हेने डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने पारंपरिकतेपेक्षा तिप्पट उत्पादन मिळत होते. हा फरक पहिल्या ४ - ५ तोड्यामध्ये जाणवल्यानंतर मग पुर्ण प्लॉटला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या सप्तामृताच्या फवारण्या १५ दिवसांना घेऊ लागलो. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने केलेल्या २० ओळीमधीलही उत्पादनात वाढ झाली. मात्र तरीही सुरुवातीपासून ज्या ६ ओळींना डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले होते त्या ओळींमधील माल तुलनेत थोडा जास्तच मिळत होता.

भुरीवर हार्मोनी प्रभावी

विशेष म्हणजे मला यामध्ये हार्मोनी या औषधाचा अतिशय चांगला रिझल्ट मिळाला. मिरची चालू होण्याच्या भुरी रोगाचा प्लॉटवर प्रादुर्भाव झाला होता. त्यावर मी हार्मोनी औषधाची स्पेशल फवारणी केली. त्याने काही प्रमाणातच भुरी कमी झाली. मात्र कंपनी प्रतिनिधी श्री. अशोक काटे (मो. ९७६४९२७०७०) यांच्या सल्ल्यानुसार लगेच ८ व्या दिवशी हार्मोनीची दुसरी फवारणी केली. त्याने भुरी रोग पुर्णतः थांबला व त्यानंतर शेवटपर्यंत प्रादुर्भाव झाला नाही. सांगायचे तात्पर्य म्हणजे 'हार्मोनी' हे एक सेंद्रिय बुरशीनाशक असल्याने त्याचा परिणाम होण्यास थोडा जास्त वेळ लागला पण दिर्घकाळ परिणाम राहिल्याने प्लॉट संपेपर्यंत भुरी रोगाचा पुन्हा प्रादुर्भाव झाला नाही.

यावरून असे जाणवले डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर कधीही केला तरी उत्पादनात वाढ होते. मात्र सुरुवातीपासून वारपले तर 'खर्च कमी व उत्पादन विक्रमी' असाच अनुभव येतो. या प्लॉटमधून नोव्हेंबर २०१६ नंतर दर आठवड्याला ४ - ५ क्विंटल उत्पादन मिळू लागले. सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये या मालाला ८ रु. किलो भाव मिळाला. पुढे मात्र भावात वाढ होऊन ३० रु. किलोपर्यंत भाव मिळाला. ही मिरची १० मे २०१७ पर्यंत चालली. तर एकूण २०० क्विंटल उत्पादन मिळाले. सरासरी १५ - २० रु. किलो भावाप्रमाणे २।। लाख रु. अर्ध्या एकरातून २०० क्विंटल उत्पादन मिळाले. यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्यांचा खर्च २० हजार रु. इतर औषधे ८ हजर रु., बियाणे ७ हजर रु. आणि किरकोळ मशागत वगैरे १५ हजार असा एकूण ५० हजार रु. खर्च आला.

या अनुभवावरून चालूवर्षी ऑगस्ट २०१७ च्या ढोबळी मिरची लागवडीस तसेच कापूस, सोयाबीन या पिकांवर देखील सुरुवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर आमच्या भागातील प्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार करणार आहे.