३२५ रू. कॅरेट भाव असताना आमच्या डाळींबाला मिळाला ५०० रू. भाव

श्री. विजय यादव खैरनार,
मु. पो. चास, ता. सिन्नर, जि. नाशिक.



माझ्याकडे २ एकरमध्ये शेंदरी जातीची डाळींब बाग १४' x १४' वर ३ वर्षाची आहेत. त्यावर डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापर करण्याचे ठरविले. पानगळ झाल्यानंतर पाणी दिल्यानंतर ५ व्या दिवशी जर्मिनेटर १ लि. ची २०० लि. प्नायातून फवारणी केली. फुटवा एकसारखा लवकर झाला. पाने मोठी, रुंद होऊन काळोखी चांगली मिळाली.

दुसरी फवारणी थ्राईवर १ लि. आणि क्रॉंपशाईनर १ लि. ची २०० लि. पाण्यातून केली, तर लगेच १५ दिवसांनी फुलकळी सुरवात झाली. मोठ्या प्रमाणात मादी फुले निघाली. कडक उन्हाळा व पाणी की पडल्याने फुलगळ थोडी झाली, परंतु सप्तामृतातील थ्राईवर व क्रॉंपशाईनरमुळे फळधारणेनंतर फुलकळी टिकून राहिली. नर फुले क्लॉवरिंगनंतर गळाली.

गाठसेटिंग अवस्थेत दिसरी फवारणी थ्राईवर १ लि. आणि क्रॉंपशाईनर १ लि. ची २०० लि. पाण्यातून केली. सोबत बुरशीनाशक व किटकनाशकाचा वापर योग्य प्रमाणात केला. फुले आकार धरू लागली, झाडांवर फळांची संख्या ६० ते ७० होती. नंतर १५ दिवसांनी थ्राईवर १ लि. आणि क्रॉंपशाईनर १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्यानंतर माल काढणी अगोदर १५ दिवस क्रॉंपशाईनर १ लि. आणि राईपनर १ लि. ची २०० लि. फवारणी केली. आमच्या डाळींबाचा आकार मोठा होऊन चमकआली. खराब माल कमी निघाला. प्लेग, सरकोस्पोर, अल्टनेरियाचे स्पॉट नव्हते. फुलांना चकाकी तजेलदारपणा आला. रासायनिक खते कमी प्रमाणातच दिली होती.

बागेत मार रोगाचे प्रमाण कमी आहे. किंग साईज फळे असल्याने कॅरेटमध्ये नग कमी बसत असे. एक्सपोर्ट ११० कॅरेट माल ३२ रू. किलोने गेला. ३२५ रू. कॅरेटला भाव असताना ४५० ते ५०० रू. प्रमाणे भाव मिळाला.