भगव्याला दर ७० ते ७५ रू. किलो

श्री. दत्तात्रय अंबादास जाधव,
मु. पो. भावी निमगाव, ता. शेवगाव, जि. अ. नगर.
फोन: (०२४२९) २७०३६५गेली ४ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वांगी, खरबुज, डाळींब या पिकांना वापरत आहे.

वांग्याला पंचामृत ९३ साली वापरले होते. थ्राईवरने फुट निघून फुलगळ थांबली होती. क्रॉंपशाईनरमुले झाडाला काळोखी येऊन फळे चमकदार मिळाली. त्यामुळे बाजारभाव अधिक मिळत असे. या अनुभवावरून डाळींबाला कळी फुटण्यासाठी जर्मिनेटर, प्रिझम वापरतो. तसेच क्रॉंपशाईनर फळे लिंबाएवढी असताना एकदा आणि नंतर पुन्हा १५ ते २० दिवसांनी फवारतो. त्याचा फायदा खराब वातावरणातही फळांवर व झाडांवर विपरीत परिणाम होत नाही. फळांचा टिकाऊपणा वाढतो. फळांना चमक येते. त्यामुळे भाव अधिक मिळतात. डाळींब पुणे मार्केटला तसेच नाशिकला पाठवितो. मागच्या वर्षी १ नंबर ने पुणे मार्केटला तसेच नाशिकला पाठवितो. मागच्या वर्षी१ नंबरने पुणे मार्केटला (७० ते ७५ रू. किलो भावाने) विकले. झाडावर ३५ - ४० फळे धरली होती. ३५० ते ४०० ग्रॅमची फळे होती. शेखर तात्याबा कुंजीर यांच्या गाळ्यावर (पुणे) माल विकला.