डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भरघोस, दर्जेदार उत्पादन घेणाऱ्या डाळींबा बागायतदारांचे अनुभव

श्री. धोंडीभाऊ मारुती मुटके, मु. पो. भोरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे. फोन: ९८६०३८०८०६



मी व माझे भाऊ गेल्या ८ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन) वापरीत आहे. पीक कोणतेही, असो ह्या औषधांची फवारणी न चुकता आम्ही घेतो.

आम्ही ६ जून २००४ रोजी शेंदरी जातीच्या डाळींबाची रोपे आंबी खालसा येथून ९ रू. ला एक हुंडी प्रमाणे आणली, एकरी ३२२ रोपे लावली, लागवड १०' x १२' अंतरावर १॥ x १॥ फुटाचा खड्डा घेऊन केली. लागवडीअगोदर खड्ड्यात कल्पतरू सेंद्रिय खात ४०० ग्रॅम + सुपर फॉस्फेट २५० ग्रॅम + थायामेट चमचाभर (चहाचा) प्रति खड्ड्यात टाकून ७ जून २००४ ला लागवड केली. साधारण १ ते १॥ महिन्याच्या अंतराने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या फवारण्या घेतल्या २० डिसेंबर २००५ ला २० मिली इथ्रेल प्रती पंपास घेऊन फवारले, त्यामुळे पानगळ झाली. कल्पतरू १५० किलो, सुपर फॉस्फेट १५० किलो, बोरॉन १ किलो, पोटॅश २५ किलो देऊन पाणी दिले. नंतर दुसरा डोस शेणखत, सुपर फॉस्फेटचा फळ सेटिंग झाल्यानंतर फळे लिंब सुपारीच्या आकाराची झाल्यावर दिला. तिसरा डोस फळ चिकूच्या आकाराचे असतान १२:३२:१६ च्या एकरी २ बॅगा दिल्या.

पहिली फवारणी भार धरल्यानंतर १५ दिवसांनी जर्मिनेटर ३० मिली + थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली + रोग १५ मिली प्रती पंपाला घेऊन केली. दुसरी फवारणी ३५ दिवसांनी थ्राईवर ४० मिली क्रॉंपशाईनर ४० मिली + राईपनर १५ मिली + प्रोतेक्टंट १५ ग्रॅम + निमार्क ३० मिली प्रति पंपाला घेऊन केली. नंतर तिसरी फवारणी सुपारीच्या आकाराची फळे झाल्यावर थ्राईवर ४० मिली + क्रॉंपशाईनर ४० मिली + न्युट्राटोन २५ मिली + एण्डोसल्फान १५ मिली प्रति पंपास घेऊन केली. चौथी फवारणी फळ चिकूच्या आकराचे असताना थ्राईवर ५० मिली + न्युट्राटोन ३५ मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली + बाविस्टीन १० मिली प्रति पंपास घेऊन केली. पाचवी फवारणी फळे पेरूच्या आकाराची असताना न्युट्राटोन ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली + प्रोतेक्टंट २५ ग्रॅमची १२ लि. पाण्यातून केली.

वरील पद्धतीने फवारण्य घेतल्यामुळे माल भरपूर लागला. गळ अजिबात झाली नाही, फुटवे भरपूर निघाले. माल जास्त सेट झाला. हे पहिलेच वर्षे असल्यामुळे आम्ही झाडाची क्षमता पाहून फळे धरली. सर्वसाधारण ४० पासून ते ७० - ७५ फळे एका झाडावर धरली. ही सर्व मोठी फळे न्युट्राटोन औषधामुळे मिळाली, क्रॉंपशाईनरमुळे शायानिंग चांगली मिळाली, फळाची क्वॉलिटी वाढली, फळ टणक व जाड सालीचे तयार झाले. थ्राईवरमुळे सुरुवातीच्या कालावधीतील गळ थांबली व सेटिंग चांगले झाले.

पहिला तोडा ७ जून २००६ ला केला. ३९ कॅरेट निघाला, एका कॅरेट मध्ये २३ ते २५ किलो माल मावतो. ८२० किलो माल ३७५ रू. प्रति कॅरेट भावाने विकला, तर किलो मालाला २७० रू. प्रति कॅरेट भाव मिळाला.

मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगू इच्छितो, की २००५ व ०६ ह्या कालावधीत ज्यांनी डाळींबाची फळे धरली, त्यांना माल कमी लागला. ५ ते ६ वर्षापासून डाळींब करणाऱ्यांनाही हाच अनुभव आला. मात्र मी डॉ.बावसकर सरांच्या नारायणगांव सेंटरच्या प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार फवारण्या केल्या व खत वापरल्यामुळे हे साध्य झाले.