डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने डाळींबावर खर्च कमी दर्जेदार अधिक माल, भाव न नफा अधिक

श्री. तुकाराम भानुदास चेडे,
मु. पो. भावी निमगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर.
मो. ९७६३६७२१४१



भगवा डाळींबाची ५॥ एकरमध्ये १५' x १५' वर जून २००४ मध्ये लागवड केली. या डाळींबाला शेणखत, रासायनिक खतांचा वापर करून २ वर्षात झाडांची पुर्ण वाढ करून घेतली. जून २००६ मध्ये या डाळींबाचा पहिला बहार धरला. त्यावेळी पुणे मार्केटला मार्केटला आलो असता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसला भेट देऊन डाळींब व इतर पिकांबद्दल सरांकडून सविस्तर माहिती घेतली. तेव्हा झाडावर ५० ते ६५ फळे धरली होती. फळे साधारण लिंबाहून मोठी होती. तेव्हा थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर,प्रोटेक्टंट, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने एकदम चांगला फरक जाणवला. फळांचा आकार वाढून सालीस चमक आली. त्यामुळे पुन्हा ५ - ५ लि. सप्तामृत औषधे आणून १५ ते २० दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घेतल्या. फळांचे पहिल्याच बहाराला उत्तम पोषण झाले. फळे ४०० ते ६०० ग्रॅम वजनाची मिळाली. या अनुभवावरून वरीलप्रमाणे दोन बहार घेतले. एकरी ५ टन उत्पादन मिळाले. यासाठी २५ ते ३० हजार रू. खर्च येत असे. खर्च वजा जाता ५० - ६० हजार रू. एका बहाराला मिळत.

गेल्यावर्षी डिसेंबर २००७ मध्ये चौथा बहार धरला. शेणखताबरोबर, निंबोळी पेंड व थोड्या प्रमाणात रासायनिक खताचाही वापर केला. बागेला पणी दिल्यानंतर जर्मिनेटर थ्राईवरच्या जानेवारी, फेब्रुवारी दोन फवारण्या केल्या. त्याने अपेक्षपेक्षा अधिक प्रमाणात कळी लागली. त्यानंतर सप्तामृत औषधांची मार्चच्या पहिल्या आठवड्यात फवारणी केली. त्याने फळांचे सेटिंग चांगले झाले. त्यावेळी २३ मार्चला याच प्लॉटवर डॉ.बावसकर सरांचे डाळींब, केळी, कलिंगड, कांदा व भाजीपाला पिकांवरील कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन झाले. या मार्गदर्शनाचा लाभ पंचक्रोषीतील इतरही बागायतदारांना झाला. त्यांनंतर नियमित ६ ते ७ फवारण्या सप्तामृताच्या केल्या. तर नेहमीपेक्षाही फळांचे पोषण अधिक होऊन सालीस आकर्षक चमक आली. एकरी १० टन उत्पादन मिळाले. खर्च ३० हजार रू. आला. सर्व माल पुणे मार्केटला मे. शेखर तात्याबा कुंजीर गाळा नं. ३२० यांच्याकडे विकला. मालाला चमक व एकसारखा आकार असल्याने ४० रू. किलोस भाव मिळाला. १ सप्टेंबरला पहिला तोडा केला. १० सप्टेंबरपर्यंत माल (काढणीचा) संपला. अजून १५ ते २० % लहान माल मागे शिल्लक आहे.