'मिडीयाने' माझ्या बागेची दखळ घेतली

श्री. सुनिल किसन शिंदे,
काजी सांगवी, (शेती - वाहेगांवा), ता. चांदवड, जि. नाशिक.



क्षेत्र : ६० गुंठे, लागवड १५' x १५' शेंदरी व आरक्ता डाळींबाच्या बागेसाठी सेंद्रिय खते दिल्याननतर व पानगळ झाल्यानंतर १ लिटर जर्मिनेटर व २०० लिटर पाणी या प्रमाणात पहिली फवारणी केली. त्यामुळे फुटवा उत्तम प्रकारे व भरपूर झाला. नंतर १०/ १२ दिवसांनी जर्मिनेटर व निमझॉंल यांचा दुसरा फवारा घेतला. त्यामुळे पत्ती मोठी व रुंद होण्यास मदत झाली. अतिशय दुष्काळात जेथे पाण्याचा थेंबही मिळणे मुष्कील असते. (फेब्रुवारी ते जुनपर्यंत पाण्याचे अतिशय दुर्भिक्ष असते) अशा भागांत डाळींब बाग अतिशय सुंदर फुलली. पत्ती फोडण्यास व रुंद करण्यास जर्मिनेटर हे औषध फार उपयुक्त ठरले. पुढील स्प्रे थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लिटर २०० लि. पाण्यातून दिल्यानंतर फुले निघण्यास व पत्तीला शायनिंग येण्यास चांगली मदत झाली. पाने तेलकट व हिरवीगार झाली. मी स्वत: अनुभव घेतला की कोवळ्या कळ्या व फुले हाताच्या बोटाने तोडून बघितले तर ते तुटत नव्हती. इतकी पॉवर त्या फुलामध्ये आली. सदर शेतीची बातमी ८ मार्च २००६ रोजी दै. सकाळ, दै. अॅग्रोवन, दै. गावरकी, दै. देशदूत व दिनवेध मधून प्रसारीत झाली.

श्री. सय्यद साहेबांनी वेळोवळी बागेस भेट देऊन मला मार्गदर्शन केले. खेडगांव, ता. दिंडोरी येथील श्री गणेश कृषी सेवा केंद्रात सविस्तर चर्चा केली. मी शिक्षक म्हणून खेडगांव येथे नोकरी करतो. सदर मुलाखत ई. टीव्ही व सहयाद्री वाहिनीवरून एप्रिल २००६ मध्ये प्रसारीत झाली.