मोठ्या शहरांच्या मार्केटमध्ये विक्री करणाऱ्या डाळींब बागायतदारांचे अनुभव

श्री. संजय महारू भामरे,
मु. पो. पिंगळवाडे, ता. सटाणा , जि. नाशिक,
फोन :(०२५५५ ) २३८७५१,
मो. ९४२१५०२१३६



अहमदाबाद मार्केटमध्ये डाळींब एक नंबरने गेले

मी डॉ. बावसकर सरांची औषधे मागील वर्षी द्राक्षाला वापरली, त्या अनुभवातून यावर्षी डाळींब या फळबागांसाठी वापरण्यास सुरुवात केली. या औषधांमुळे मला यावर्षी खूप फायदा झाला. मी सुरूवातील १ जानेवारीनंतर १० फेब्रुवारी व १० मार्च रोजी बागांना पाणी दिले. पहिले पाणी दिल्यानंतर ४- ५ दिवसांनी जर्मिनेटर व किटकनाशकाची पहिली फवारणी केली. सर्व बागांना एकसारखी व जोमदार फूट निघाली. नंतर १५ दिवसांनी थ्राईवर, क्रॉंपशाईनर यांची फवारणी केली. ही फवारणी केल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी फुले निघण्यास सुरुवात झाली. फुलकळी एकदम मोठ्या आकाराची टपोरी निघाली. उष्णता असताना सुद्धा फुलगळ झाली नाही. पाने रुंद, मोठ्या आकाराची होती. उन्हामध्येसुद्धा पाने एकदम तजेलदार दिसत होती. यावर्षी तर पावसाने खुप थैमान घातले होते. आमच्याकडे २ महिने पाऊस एकसारखा चालू होता. त्यामुळे लोकांच्या बागांवर काळेडाग, फळकुज दिसायला लागला. आता डाळींब मार्केटला जाणे शक्यच नाही असे जाणवत होते. परिणामी मी आधी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सर्व औषधांची पाऊस चालू होण्याच्या अगोदरपासूनच फवारणी केली होती, त्यामुळे माझ्या बागांवर रोगांचा प्रादुर्भाव जाणवत नव्हता. नंतर मी नाशिकहून लगेच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कृषी विज्ञान केंद्रामधून थ्राईवर + क्रॉंपशाईनर + न्युट्राटोन प्रत्येकी ५ लि. आणले व फवारणीस सुरुवात केली. मला औषधे घेण्यासाठी १५० किलोमीटर अंतरावर जावे लागते. मी पूर्ण पावसाळा संपेपर्यंत थ्राईवर + क्रॉंपशाईनर + बुरशीनाशके यांचा खूप वापर केला, १० दिवसांच्या अंतराने फवारण्या केल्या. मी जर त्या वेळेस ही औषधे वापरली नसती. तर मला माझी बाग जास्त पाण्यामुळे सोडून द्यावी लागली असती. यावर्षी कित्येक शेतकरी बांधवांच्या डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांनी ही औषधे सुरूवातीपासून वापरली असती, तर त्यांच्या बागेचे नुकसान टळून त्यांच्यावर नैराश्याची वेळ आळी नसती.

यावर्षी डाळींबाला सुरूवातीला अजिबात बाजराभाव नव्हते. १० ते १२ रू. दराने शेंदरी व ७ ते ९ रू. दराने गणेश डाळींबाची विक्री होत होती. पाऊस चालू असल्याने माल खराब होत होता. परंतु मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा पुरेपूर वापर केला होता. त्यामुळे बाजारभाव नसल्यामुळे दीड महिने माल झाडावर ठेवला तरी माल खराब झाला नाही, कुज, गल नाही, क्रेकिंग गेले नाही. नंतर मी सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद मार्केटला ४५ रू किलो भावाने माल विकला. अहमदाबाद मार्केट मध्ये १ नंबर माल असल्याने भाव अधिक मिळवून रोकॉर्ड तोडून टाकले. आमचा माल अहमदाबाद मार्केटमध्ये मे. हेमंतदास अॅण्ड ब्रदर्स या व्यापार्‍याकडे ६ वर्षापासून जात आहे. यावर्षी व्यापार्‍यानेसुद्धा सांगितले की, "कोणाच्याही मालात दम नाही, परंतु आपला माल मागील वर्षापेक्षा यावर्षी खूप उत्कृष्ट प्रतीचा आहे." तेव्हा मी त्यांना सांगितले, याचे कारण फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच. शेतकरी बांधवांना मी एकाच सांगू इच्छितो की, आपली जमीन व आपली फळबाग यांचे आयुष्य जर वाढवायचे असेल तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच वाढवू शकेल. यावर्षीही द्राक्षालाही पूर्ण तंत्रज्ञान वापरले आहे.

शेतकरी बंधुंना अजून एक सांगायचे, म्हणजे आपला जसा जीव आहे, त्याच झाडांना पण जीव आहे. विष पाजून मारू नका, तर त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत व हार्मोनी वापरून वाचवा व त्या झाडापासून अधिक दर्जेदार उत्पादन व कमी खर्चात अधिक नफा मिळवा.