रोगमुक्त बाग, फुले दर्जेदार

श्री. रामहरी पाटीलबुवा दराडे,
मु. नळवाडी, पो. चास, ता. सिन्नर, जि. नाशिक,
फोन (०२५५१) २६०८९९ ,
मो. ९८५०५९३६९०शेंदरी, आरक्ता आणि गणेश जातीच्या डाळींबाचे १० एकर क्षेत्र असून सर्व डाळींब बागेची छाटणी डिसेंबर २००५ मध्ये केली. शेणखत तसेच इतर सेंद्रिय खतासोबत थोड्या प्रमाणात रासायनिक खताची मात्र दिल्यानंतर झाडावर पाने दिसत होती, मात्र फुलकळी नव्हती. त्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली असता ८ ते १५ दिवसांत फुलकळी मोठ्या प्रमाणात निघालेली जाणवली. मालाची काडी फुलकळीने बहरून आली. पाने रुंद, शाईनिंग अप्रतिम, फुलकळी सतेज निघाली. नंतर खराब वातावरणामुळे फुलगळ जाणवू लागल्यावर दुसरी फवारणी १८ दिवसांनी थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. ची २०० लि. पाण्यातून केली त्याने फुलगळ थांबली. आमच्या, भागातील शेतकर्‍यांच्या बागेतील फुलकळीची गळ फार झाली. आपल्या बागेवर वरील फवारण्या घेतल्यामुळे मावा, थ्रीप्स (Stemborer), खोड किडा, यांचा प्रादुर्भाव अजिबात झाला नाही.

त्यानंतर १५ - १५ दिवसांच्या अंतराने थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. ची २०० लि. पाण्यातून ३ री फवारणी १३ मार्च आणि ४ थी फवारणी २८ मार्च २००६ ला केली असता गाठ सेटींग अतिशय चांगली झाली. चास येथील ८ ते १० डाळींब बागाईतदारांनी बागेची पाहणी केल्यानंतर दरवर्षी पेक्षा बाग सरस वाटते असे सांगितले.

फळांना शायनिंग भरपूर असून आकाराने मोठी आहेत. फळांवर कोठेही डाग नाही. साधारणपणे प्रत्येक झाडावर ८० ते १०० फळे आहेत. फळांच्या फुगवणीसाठी ३ ते ४ दिवसात पुढील फवारणी करणार आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे, खते मे.पी.एल.गवळी, सिन्नर यांचे येथून खरेदी करतो.