किमया कल्पतरूची

श्री. ईश्वर मधुकर माळवाड,
मु. पो. कुपखेडा, ता. सटाणा, जि. नाशिक,
मोबा. ९०११२६०३२२


मागील वर्षी मी साधारण १० वर्षाच्या भगवा डाळींबाच्या २०० झाडांसाठी ४ बॅगा कल्पतरू विकत घेतले होते. कुटुंबातील इतर व्यक्तीचा याला विरोध होता. रासायनिक खते वापरण्यापेक्षा हे खत का वापरतो ? असे म्हणता. परंतु हे खत प्रत्येक झाडास १ किलो फळांच्या सेटिंगच्या अवस्थेत दिल्यानंतर १० दिवसांनी निंदणी करण्यास सुरुवात केली, त्यावेळेस आमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या असे निदर्शनास आले की, ड्रिपखाली डोक्यातील केसासारख्या पांढऱ्या मुळ्या वाढलेल्या होत्या. व झाडांना टँकरने पाणी देऊन ही झाडास पाण्याची कमतरता जाणवली नाही. पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ड्रीपखालील मुळ्यांच्या पुंजक्यासह खत मिश्रीत माती पिळल्यानंतर १०० मिली पाणी निघाल्याचे आढळले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यादेखील केल्या. तर या प्लॉटपासून कमी पाण्यावर (टँकरने पाणी देऊन) ६ टन माल निघाला.

साईज २५० ते ५०० ग्रॅम ची फळे मिळाली. ६८ रू. किलोप्रमाणे जागेवरून विकला गेला. विशेष म्हणजे आमच्या भागात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव असतानाही आमच्या बागेवर तेल्याचा एकाही झाडावर प्रादुर्भाव झाला नाही.