कल्पतरूमुळे फळबागांना पाण्याचा ताण सहन करण्याची ताकद

श्री. सुदीत धर्मा पवार,
मु. पो. नळकेस, ता. सटाणा , जि. नाशिक.
मोबा . ९४२३६९९३६७


माझी भगवा डाळींबाची ७०० झाडे ७ ते ८ वर्षाजी आहेत. लागवड १२ x १२' वर आहे. जमीन मध्यम प्रतीची व ठिबक केली आहे. यावर्षी मी एप्रिल २०११ मध्ये झाडाला पहिले पाणी दिले. पाण्याचे प्रमाण कमी असून मी टॅक्टरने पाणी देऊन बहाराचे नियोजन केले. काडीवर जर्मिनेटर फवारले. १२ दिवसानंतर थ्राईवर, क्रॉंपशाईनर फवारले. त्यानंतर गाठ सेटिंगनंतर कल्पतरू खताच्या ८ बॅगा ७०० झाडांना दिल्या. तर पाऊस जुलैपर्यंत पडलाच नाही. तरी कल्पतरूमुळे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता झाडत जाणवली. पाऊस झाल्यानंतर नियोजीत पद्धतीने माल काढणीपर्यंत किटकनाशक, बुरशीनाशक, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले.

बागेचे २५ लाख

१ नोव्हेंबरला मी प्रत्येक झाडावरून ३० किलो ६८ रू. किलोने माल विकून माझ्या झाडावर १५ किलो माल शिल्लक होता. तरी व्यापाऱ्याला प्रत्येक झाडावरचे ३० किलो विकलेल्या मालापासून २० लाख रू. मिळाले व उर्वरित मालाचे ७ ते ८ लाख रू. होतील. कल्पतरू वापरल्याने माझ्याबागेतील ४ - ५ झाडांवर अगोदर तेल्या होता, तो वाढला नाही व मालाचे आकार शायनिंग वाढून वजन मिळावे.