शहरी, ग्रामीण, टेरेसबागेसाठीही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे

श्री. ई. एस. इनामदार (B.E. Electrical, Superintend Engg. Retd. MSEB)
नरकेशरी सोसा, गणेशनगर, धायरी, पुणे -४११०४१,
फोन नं. (०२०) २४३९२५७७ / मोबा.९६२३११६७४२


आमच्या २ गुंठे (२१०० ची. फूट) परसबागेकरीता १४ - १५ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतो. बागेमध्ये रत्ना आंब्याचे एक, चिकूचे एक आणि बाणवली नारळाची २ झाडे आहेत.

गेल्यावर्षी अतिशय प्रतिकूल हवामान होते. त्यामुळे मोहरगळ झाली. तरीही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्यावर एका झाडावरून १२ डझन आंबे मिळाले. आंबे मोठे, चवदार असल्याने ज्यांना हे आंबे दिले ते पुन्हा या आंब्याचीच मागणी करू लागले. कल्पतरू २० किलो नेले होते ते आंबा, चिकू आणि नारळाच्या २ झाडांना प्रत्येकी ५ - ५ किलो दिले. झाडे २० वर्षाची आहेत.

बाणवली नारळाच्या २ झाडांपासून या तंत्रज्ञानाने ४०० - ५०० फळे दरवर्षी मिळतात. एवढे नारळ वापरू शकत नसल्याने त्यापासून गोटा खोबरे तयार करतो. नारळ काढल्यानंतर गच्चीवर वाळवतो. नंतर सोलून गोटा खोबरे माझ्याकडील 'सोलरवर' संपूर्ण गोटा २ ते ३ तास दुपारच्यावेळी भाजतो. त्यामुळे खोबऱ्याला आतून बुरशी लागत नाही. हे गोटा खोबरे सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना १ ते २ किलो देतो.

परसबागेत कढीपत्त्याचे एक झाड लावले आहे. त्यापासून लहान - लहान रोपे पुष्कळ तयार झाली आहेत. त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या या फळझाडांबरोबर घेतो. त्यामुळे कढीपत्त्याची पाने चमकदार, सुवासिक मिळतात.

सरांनी सांगितले होते केशर आंबा लावा मात्र आम्ही रत्ना लावला. केशराला आपले हवामान मानवते. त्यामुळे केशराची फळे अधिक दर्जेदार मिळतात. मात्र रत्नाला आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने रत्नाचीदेखील फळे उत्तम प्रतीची मिळत आहेत.

बागेत फुलझाडे - जास्वंद, पांढरी तगर, तुळस आहे ती देखील चांगली वाढते.

अगोदर कांदे लावले होते. तेव्हा २० किलो कांदे निघाले. पालक, मिरची, कोथिंबीर ही देखील पिके उत्तम येत असत. अलिकडे फळझाडे मोठी झाल्याने सावली जास्त होते. त्यामुळे भाजीपाला पिके व्यवस्थित येत नाहीत. त्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने टेरेसवर ही पिके घेणार आहे.

सरांनी सांगितल्या प्रमाणे बागेच्या कोपऱ्यात ३' x २' चा खड्डा घेऊन त्यात पालापाचोळा, भाज्यांचे अवशेष साठवून खत तयार करतो. आज (११ /११/२०१२ ) सरांनी सांगितले या खड्ड्यामध्ये पालापाचोळ्यावर ५० ग्रॅम डाळीच्या पिठाचे पाणी, ५० ग्रॅम गुळाचे पाणी आणि कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम टाकले असता आपोआप गांडूळ वाढून गांडूळ खत तयार होईल. त्याप्रमाणे प्रयोग करणार आहे.

उंच फळझाडांना सप्तामृत फवारण्यासाठी व्हॅक्युमक्लिनरला बाटलीमध्ये सप्तामृताचे द्रावण घेऊन बाटली उलटी जोडून प्रेशरने पूर्ण झाडावर फवारणी करतो. नारळाला जून - जुलैमध्ये मोहोर लागतो. त्याची फळे मे मध्ये काढून उन्हाळ्यात टेरेसवर वाळवतो.

सरांनी सांगितले नारळाला कल्पवृक्ष संबोधले जाते. मात्र देशाच्या आणि जगाच्या पातळीवर नारळ हा कल्पवृक्ष राहू शकला नाही. याचे कारण, ग्लोबल वार्मिग, रोग किडीचा प्रादुर्भाव, फळगळ, पाऊसमान कमी अशी होत. तेव्हा आम्ही विकसीत केलेला 'सिद्धीविनायक' शेवगा आधुनिक कल्पवृक्ष सिद्ध केला आहे. ह्या शेवग्याची वैशिष्ट्ये म्हणजे हल्लीच्या नॉनव्हेजच्या युगात जी मुले, माणसे, स्त्रिया चिकन, मटन, मासे खातात तेथे लहान मुलांवर आम्ही प्रयोग केला तर लहान मुलांच्या जेवणात या सिद्धीविनायक शेवग्याची भाजी खाण्यास दिली तर ते पक्वानासारखे त्यावर तुटून पडले व चिकन पॉपलेट फिश, मटन खाण्यास नको म्हणू लागले. ही केवढी क्रांती सिद्धीविनायक शेवगा व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केली, हे प्रत्यक्ष अनुभव वाचून सोडून देवू नका. या शेवग्याचा गेल्या १० -१५ वर्षात कधीही भाव कमी झाला नाही. जवळपास ३०० रोगांवर याचा इलाज होत असल्याने तो आरोग्याचा दागिना आहे. त्याच्या कृषी विज्ञानमध्ये दर महिन्यास मुलाखती येत असतात. असे शेवग्याचे देशभर १५ ते २० हजार मॉडेलस आहेत. तेव्हा सरांनी परवाच आकाशवाणी (पुणे) वर सांगितले की, शहारामध्येदेखील घरटी परसबागेत १ 'सिद्धीविनायक' शेवग्याचे झाड असावे. म्हणजे त्यापासून शेंगा मिळून कुटूंबाचे आरोग्य सुधारेल तसेच मित्र मंडळी, नातेवाईकांना या शेंगा भेट देऊ शकाल.

सरांच्या तंत्रज्ञानावर आम्ही अतिशय खूप आहोत. माझे अनेक नातेवाईक आमची वाग पाहिल्यावर समाधान व्यक्त करून तंत्रज्ञानाबद्दल विचारणा करतात. त्यांना या तंत्रज्ञानाचे महत्त्व समजल्याने ते देखील हे तंत्रज्ञान वापरू लागले आहेत.