सायकस एक श्रीमंत प्रतिष्ठा वाढविणारा पर्णवृक्ष

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


सायकस हे फुलदाण्या, पुष्पगुच्छ फुलांच्या बरोबर गर्द हिरव्या रंगाचे आकर्षक पान 'फिलर' म्हणून भर घालते. या झाडाची वाढ अतिशय मंद असते. याचा आकार व व्याप्ती या झाडाची किंमत ठरविते. एक वर्षाचे २ फूट व्यासाचे झाड साधारण ५ ते ६ हजार रुपयाला मिळते. २ वर्षाचे ३ फूट व्यासाचे झाड ७ ते ८ हजार रुपयाला मिळते. ४ फुट व्यासाचे १० ते १५ हजार रुपयाला मिळते. याची उंची २ ते २॥ फुट असते. हे झाड मोठ - मोठ्या कंपन्या व सुखवस्तू लोक आपल्या दर्शनी भागात कुंड्यामध्ये लावतात. सायकसचे वैशिष्ट्ये असे की, जसे घरासमोर मर्सिडीज बेंझ, रोल्स रॉयस, ऑडी असते. तसे बगिचात सायकसचे झाड हे घराची व कारखान्याची प्रतिष्ठा ठरविते. अशा सायकसची वाढ जलद करता येत हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्यावर वर्षातून २ ते ३ वेळा नवीन पाने येवून ती आकर्षक, प्रमाणबद्ध, गोलाकार, डेरेदार, आकारबद्ध निर्माण होतो. याचा फोटो कव्हरवर मार्गदर्शनासाठी मुद्दाम दिला आहे.