कापसातील आंतरपीक 'सिद्धीविनायक' मोरिंगा यशस्वी !

श्री. आर. के. वाघमारे, मु. पो. जळगाव फेरन, ता.जि. औरंगाबाद,
मोबा. ९८९०६३६८६७


२ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पुस्तके व 'कृषी विज्ञान' मासिक वाचतो. त्यातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून प्रेरणा मिळते. खात्रीसाठी त्यांना फोन करतो. आता तंत्रज्ञान वापरू लागलो आहे. ३ विहीरी आहेत. पाझर तलाव आहे. १२ एकर शेती आहे. कापूस, बाजरी, तूर घेतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा मोरिंगा शेवगा कापसामध्ये लावला आहे. त्याला फुले लागतात पण गळतात.

३० गुंठ्यात सध्या ४६२ झाडे आहेत. कापसात शेवगा चांगल येतो. फवारणी न केल्याने १० - १२ फुले आहेत पण अति पावसाने ती गळतात. फळधारणा होत नसल्याने सरांचा सल्ला घेण्यास आज १२ ऑक्टोबर २०१३ रोजी आलो आहे. सरांनी सांगितले, "सप्तामृत ५०० मिली १० -१५ दिवसांनी फवारावे, म्हणजे नाताळ ते संक्रांतीच्या दरम्यान शेवगा चालू होईल. कापसात लावलेला शेवगा हा हमखास चांगले उत्पादन देतो असा प्रयोग अनेक कापूस बागाईतदारांनी केला असून तो परवडत आहे असे कळविले आहे. मार्च, एप्रिलपर्यंत शेवग्याचे उत्पादन घेता येईल."

जमीन मध्यम प्रतिची आहे. त्यामुळे झाडांना ५०० ग्रॅम कल्पतरू द्यावे, असे सरांनी सांगितले.

मार्चपर्यंत ३ वेचण्या होतात. दोन्ही पिकांना एकाचवेळी फवारणीमुळे खर्चात बचत होते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो. शेवगा हे मिश्र पीक म्हणून लावलेले असते. मात्र शेवगाच मुख्यपीक होते आणि कापूस हे दुय्यम पीक होते. दर १० ते १५ दिवसांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारल्याने कापसावरील लाल्या जातो, रोगराई थांबते.

डिसेंबर ते मार्चपर्यंत शेवग्यापासून एकरी ४० - ५० हजार होतात. कापूस १२ ते १५ क्विंटल होतो, तो ३ ते ५ हजार रू. क्विटंल भावाने गेला तरी ५० ते ७५ हजार रू. होतात. फडदडचे ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळून त्याचे ४० हजार असे कापसाचे एकूण ९० ते १ लाख २० हजार असा एकरी दीड लाख रू. सहज मिळवून देणारा प्रकल्प आहे.