डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा १५ वर्षापासून यशस्वी वापर, 'सिद्धीविनायक' मोरिंगास रिझल्ट उत्तम !

श्री. निवृत्ती रघुनाथ कळमकर,
मु. पो. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.
मोबा. ९८८१५२२२८८



मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा पंधरा वर्षापासून वापर करत असून, पुर्वी स्वत: वापर करत होतो. आता माझा मुलगा गौरव शेती पहात आहे. गेल्यावर्षी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या मोरिंगा शेवग्याची लागवड केली आहे. ८' x ८' वर १ x १ x १ फुटाचे खड्डे घेऊन ५०० रोपांची लागवड केली. लागवडीवेळेस जर्मिनेटरची आळवणी सरांनी सांगितल्याप्रमाणे केली होती. खड्डा भरताना २०० ते २५० ग्रॅम कल्पतरू खत शेणखतामध्ये मिसळून प्रत्येक खड्ड्यात टाकले होते. लागवडी नंतर १५ दिवसाच्या अंतराने सप्तामृत ३० मिली प्रतिपंपास घेऊन २ फवारण्या केल्या. नंतर फवारणीत औषधाचे प्रमाण वाढवून घेतले. शेवग्यावर करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी पंपाला ४० मिली सप्तामृत घेऊन फवारणी केल्यामुळे करपा व मर रोग वेळीच आटोक्यात आला. लागवडीनंतर ४ महिन्यात शेवग्याला फुल येण्यास सुरुवात झाली. शेवग्याची वाढ चांगली असल्याने बहर धरला. पहिल्याच तोडणीस ३० किलो शेंगा मिळाल्या. प्रत्येक झाडावर २५० ते ३०० शेंगा होत्या. शेंगा शिरूर, पुणे मार्केटला विकल्या. काही माल स्थानिक मार्केटमध्येच विकला. या शेवग्याला सरासरी २५ ते ३५ रू. भाव मिळाला.

दोडक्यालादेखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करत असून दोडक्यावर सध्या करप्याचा प्रादुर्भाव दिसत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे स्प्लेंडर औषध नेले आहे. आता थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी ५ लि. शेवगा व दोडक्यासाठी घेऊन जात आहे. सध्या शेवग्याची छाटणी करून नवीन बहार धरला आहे.