डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घडविली आमची शेतीची 'कुदरत' !

श्री. कौस्तुभ नंदकुमार वडनेरे,
मु. पो. कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे,
मोबा. ९८२२०४८३०३


जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गहू वाराणसीवरून कुदरत वाणांचा आणून २८ गुंठे पेरला होता. जमीन मुरमाड मध्यम प्रतीची आहे. उगवणीनंतर १५ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनरची फवारणी केली. त्यांनतर प्रत्येक १५ दिवसांनी याप्रमाणे ४ फवारण्या अशा एकूण ५ फवारण्या केल्या होत्या. शेणखत १ ट्रोली, १५: १५ :१५ खत ७५ किलो दिले होते. पीक १५ दिवसाचे असताना शेण १० किलो + गाईचे शुद्ध तूप २५० ग्रॅम + मध ५०० ग्रॅम + २०० लि. पाणी याप्रमाणे एकत्र करून पाटात एकदा सोडले. तर ३।। महिन्यात गहू काढला. गव्हाची उशीरा लागवड होऊनदेखील १० क्विंटल उत्पादन मिळाले.

२ एकर ऊस फेब्रुवारी २०१३ मध्ये लावला होता. नर्सरीतून २६५ वाणाची रोपे मागविली होती. मात्र त्यामध्ये ८०% ८६०३२ वाणाचीच रोपे निघाली.

याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वेळापत्रकाप्रमाणे फवारण्या केल्या. रोपे ३० दिवसांची पाहिजे होती, तेथे ६० दिवसांच्या वरची रोपे दिली. त्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ खुंटली होती. त्यामुळे रोपे व्यवस्थित उपजत नव्हती. ऊस मरण्याच्या अवस्थेत असताना नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्यामुळे सध्या व्यवस्थित आला आहे. सध्या ७ - ८ कांड्यावर ऊस आहे.

केशर आंब्याची ५०० झाडे ७ - ८ वर्षाची आहेत. लागवड १५' x १५' वर आहे. आतापर्यंत ३ बहार घेतले आहेत. तिसऱ्या बहाराचे ५ टन उत्पादन मिळाले होते.

आता चौथा बहार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घ्यायचा आहे. त्याकरिता पहिल्या फवारणीसाठी सप्तामृत ५ - ५ लि. घेऊन जात आहे.