डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने अर्धा एकर शेवग्यापासून ३० हजार रू. नफा

श्री. संतोष पांडुरंग मुजुमले, मु. पो. कोंढणपूर, ता. हवेली, जि. पुणेओडिसी वाणाची शेवग्याची लागवड आम्ही ऑगस्ट २०११ मध्ये अर्धा एकरमध्ये केली आहे. लागवडीनंतर 'सिद्धीविनायक' शेवग्याची माहिती मिळाली. ओडीस या शेवग्याचा आतापर्यंत १ बहार घेतला आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर झाडे लागवडीपासून ते उत्पादन मिळेपर्यंत केला. सुरुवातीला जर्मिनेटरची आळवणी व १५ ते ३० दिवसाच्या अंतराने सप्तामृताच्या नियमित फवारण्या करत असे. प्रत्येक स्टेजला फवारण्या केल्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळाले. छाटणी व मशागत व्यवस्थित असल्याने पहिल्या बहाराचे ३५ ते ४० हजार रू. अर्ध्या एकरात ४०० झाडांपासून मिळाले. औषधे मजुरीचा खर्च सोडून ३० हजार रू. निव्वळ नफा मिळाला. दुसऱ्या बहाराला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत प्रति पंपास ५० मिली घेऊन फवारले तर बहार जोरदार आला आहे. फुलकळी भरपूर आहे. यावर्षी दुप्पट उत्पादन मिळण्याची आशा आहे. प्लॉट पाहण्यास परिसरातील लोक गर्दी करतात. कोणते तंत्रज्ञान वापरले असे विचारतात. या शेवग्यामध्ये डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने वांग्याचे आंतरपीक घेतले असून त्यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट आज (३/११/ १३) घेऊन जात आहे.