'लागणाऱ्या' गावच्या आल्यासाठी जर्मिनेटर ठरले संजिवनी !

श्री. किशोर बबन शिंदे, मु.पो. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा, मोबा. ७७०९०९२५३०

७० गुंठे औरंगाबादी आले जून २०१३ ला लावले आहे. २।। महिन्याचे २ फूट उंचीचे असताना थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५० मिली याप्रमापे फवारून जर्मिनेटर व हार्मोनीचे ड्रेंचिंग केले होते. त्यावेळी कुठेकुठे आले लागण्यास सुरुवात झाली होती ती पुर्णता थांबली. तांबडा रोग पडू लागला होता. तो थांबला. तसेच फुटवे वाढल्याचे जाणवले. म्हणून आज ३।। महिन्याचा प्लॉट असून पुढेही आले लागू नये म्हणून जर्मिनेटर ५ लि. आणि हार्मोनी १ लि. घेऊन जात आहे.

आमच्या गावात जवळपास सर्व शेतकऱ्यांचे आले लागले आहे. रामचंद्र जगदाळे यांचा प्लॉट उत्तम आहे. ते गेली २ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतात. म्हणून यंदा आम्हीदेखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरू लागलो व त्याचा चांगला अनुभव आला आहे. आज माझ्या शेजारच्या ३ शेतकऱ्यांनी देखील ही औषधे मागविली आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येकी ५ - ५ लि. जर्मिनेटर आणि हार्मोनी १ - १ लि. घेऊन जात आहे.

आले जर्मिनेटरमुळे अजून फुटवा करीत आहे. पुढील महिन्यात आले पोसण्यासाठी राईपनर फवारणार आहे. त्यासाठी आजच राईपनर १ लि. घेऊन जात आहे.

Related New Articles
more...