११ गुंठ्यात उन्हाळी ६० पोती कांदा

श्री. ज्ञानदेव जगताप,
मु. पो. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे.
मोबा. ९७६६९०४९०८



मध्यम प्रतिच्या ११ गुंठे जमिनीत गेल्यावर्षी जानेवारी २०१२ मध्ये डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. लागण केल्यानंतर महिन्याने सप्तामृताची १ फवारणी केली. फवारणी केल्यानंतर आठवड्याभरातच कांदा तरारला. पात हिरवीगार दिसू लागली व वाढ जोमाने झाली. पाणी वेळेवर देत होतो. पुन्हा दुसऱ्या फवारणीच्या वेळेस सप्तामृत फवारल्याने कांद्याचा आकार वाढला. नेहमीपेक्षा कांद्याचे पोषण चांगले झाले. कांदा काढल्यावर पत्तीस चमक अधिक दिसून आली. ११ गुंठ्यात ६० पोती दर्जेदार कांदा उत्पादन मिळाले. या आधी कित्येक प्रकारची औषधे फवारत असे परंतु इतक्या झटपट रिझल्ट आम्हाला मिळाला नव्हता. म्हणून आता चालू वर्षीच्या कांद्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसला भेट देऊन जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम, न्युट्राटोन प्रत्येकी ५०० मिली घेऊन जात आहे.