पारंपारिक फुलशेतीस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याचा मानस

श्री. गोविंद ठाकूर,
मु. पो. सोळू , ता. खेड, जि. पुणे,
मोबा. ९६२३८४४३८५


एक एकरमध्ये आम्ही स्टॅटीस सफेद व निळा १० सप्टेंबर २०१३ ला लावला आहे. स्टॅटीसला पाने भरपूर आहेत, पण ती कोकडली आहेत. बी घरचेच होते. १५ -२० वर्षापासून स्टॅटीस लागवड करतो. जमीन भारी काळी आहे. १।। फुटाच्या सरीला वित - वित अंतरावर लागवड असून नागमोडी पद्धतीने पाणी देतो. २।। महिन्यात स्टॅटीस चालू झाली. आता काडी वाकडी होतेय. उंची सफेदची गुडघ्याएवढी तर निळी गुडघ्याच्या खाली आहे. याला सरांनी सांगितले भारी जमीन असल्यामुळे पाणी उशीरा १२ व्या दिवशी द्या आणि १ लि. जर्मिनेटर + ५०० मिली प्रिझमचे ड्रेंचिंग (आळवणी) करा. त्यानंतर लगेच सप्तामृत २५० मिली + हार्मोनी १०० मिली फवारा. नंतर पुन्हा १० दिवसांनी हाच डोस परत रिपीट करा. म्हणजे काडी सरळ होईल. काडी भारदस्त होईल. सप्तामृताने ओपन हाऊसमध्येही दांडा मोठा होतो. पॉलिहाऊसमधील फुलांच्या गड्डीस २५ रू. दर असला तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॅटीस गड्डीला ३० ते ३५ रू. भाव मिळतो. असाच अनुभव श्री. वसंतराव लोणारे, मु पो. भोसे, ता. खेड जि. पुणे, मोबा. ९०११४९९५१६ यांनी घेतला आहे. (संदर्भा साठी कृषी मार्गदर्शिका, पान नं. ९१ - ९२ पहा.) स्टॅटीस दररोज चालू आहे. रोज १०० गड्डी निघते. सद्या मुठीत बसते अशा गड्डीला ३० रू. भाव मिळत आहे. जुलै -ऑगस्टमध्ये रोपे तयार करतो. हे पीक ३ महिने चालते. कापताना झाडाला फाटे भरपूर असतात. त्यातील जी काडी फुलेल तिच काढतो. याला शेणखत घरचेच वापरतो. रासायनिक खत लागवडीनंतर १ महिन्यानी सम्राटची एकराला ५ गोणी, टाकली होती. सरांनी सांगितले हा डोस जास्त झालाय, याला कल्पतरू दोनच बॅगा वापरल्या तरी चालतील, त्यामुळे खर्चात बचत तर होतेच शिवाय कल्पतरूने फुले जास्त दिवस टिकतात. रासायनिक खताने फुले लवकर खराब होतात. याचा खोडवा धरता येत नाही पण सरांनी सांगितल्याप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने खोडवा देखील घेणार आहे.

अॅस्टर अर्धा एकर आहे. ढाकळ डबलची अॅस्टर आहे. नवरात्रात चांगली चालते. आता २० रू. गड्डीस भाव आहे. एकूण २।। एकर जमीन आहे. सर्व फुलशेतीच करतो. गोल्डन अॅरो गणपतीत १ एकर असते. जूनची लागवड असते. गोल्डनच्या काशा वितीवरती सरीला टोकतो. तिलादेखील अलिकडे बुरशीसारखा रोग येतो. यावर सरांनी सांगितले काडीवरील पानांवरील बुरशीसाठी सप्तामृत व हार्मोनी वापरा म्हणजे बुरशी येणार नाही. गणपतीस पहिला तरवा येतो. नंतर दिवाळीत दुसरा तरवा आणि डिसेंबरमध्ये तिसरा तरवा निघतो. सारी १।। फुटाची बारीक ट्रॅक्टरनी काढतो व तिला वितीवर लावतो. तिलादेखील सप्तामृत वापरणार आहे. २।। एकरात या फुलशेतीतून ३ ते ४ लाख रू. होतात. सरांनी सांगितले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २।। एकरात सर्व वातावरण अनुकूल असल्यास ५ लाख रू. सहज मिळतील.