८ महिन्याचा ऊस १५ -१८ कांड्यावर !

श्री. गणपत पांडुरंग शिंत्रे,
मु. पो. अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली.
मोबा. ९०११९०८१९६


ऊस फेब्रुवारीत तुटून गेल्यावर उन्हाळ्यात पाणी नसल्याने काहीच वापरले नाही. जुलैमध्ये कल्पतरू एकरी २ पोते, युरीया १ पोते, डी.ए.पी.१ पोते वापरते. त्यावेळी ४ महिन्याचा ऊस ३।। फुट उंचीचा होता. खते दिल्यानंतर उसाची जाडी वाढली, फुटवा वाढला. उसाची पाने हिरवी आणि तजेलदार आहेत. सध्या ऑक्टोबरमध्ये ८ महिन्याचा ऊस १५ ते १८ कांड्यावर आहे.

आता दिवाळीत वांगी सव्वा एकर, भेंडी अर्धा एकर करणार आहे. त्याला सरांच्या सल्ल्यानुसार सर्व तंत्रज्ञान वापरणार आहे.

आधार वाणाची उसाची नवीन जात विकसीत झाली आहे. कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून त्याचा उतारा एकरी २०० क्विंटल आहे असे सांगितले जाते. मात्र आम्हाला १५० क्विंटल उत्पादन मिळाले तरी चालेल. प्रयोगादाखल यंदा याची लागवड करणार आहे. त्यालाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे.