अत्यंत प्रतिकूल परिस्थतीत भगवा डाळींब वाळवंटात यशस्वी करण्याचा प्रयत्न !

श्री. घनश्याम छगनलाल गौड,
मु.थांबडीयासर, पो. पांचलासिद्धा , ता. खिंवसर, जि. नागौर, (राजस्थान)
मो. ०८२९०३४७३३५राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यामध्ये पुर्णत: वालुकामय (वाळवंट) प्रदेश आहे. येथे पावसाचे प्रमाण फार कमी आहे. या भागामध्ये १००० फुटापर्यंत बोरवेल घेतल्यानंतर येथे पाणी लागले. या बोरवेलवर ४० के.यु.चा पंप बसविला आहे. साधारणत: एक बोअरवेल २५ एकर क्षेत्र ओलीता खाली ठेवते. परंतु हा भाग वालुकामय असल्यामुळे तेथे स्प्रिंक्लरचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. या भागामध्ये प्रामुख्याने बाजरी, गहू, जिरा, कपास, मोहरी, भुईमूग, गवारगम, यासारखी पिके घेतली जातात. या भागात उन्हाळ्यात ४८ यर ५० डी.से. तापमान असते व हिवाळ्यात ८ ते १० डी.से. तापमान असते. पाऊस तुरळक प्रमाणात असतो. अशा अत्यंत प्रतिकूल वालुकामय प्रदेशात डॉ. बावसकर तंत्रज्ञानाच्या मदतीने मत करून डाळींबाची बाग फुलवली आहे. याबद्दल नागौर कृषी अधिकाऱ्यांनी डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीव आमचे कौतुक केले. तसेच 'भास्कर' या दैनिकातून आमच्या प्लॉटच्या बातम्या प्रसारित झाल्यावर शेजारच्या ४ - ५ जिल्ह्यातील लोकांनी वर्तमान पत्रातील डाळींब शेती व रत्नागिरीवरून आणलेल्या २ वर्षाच्या ५ रोपांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्याने लागवडीनंतर ४ - ५ महिन्यात (जानेवारीत) मोहोर लागून प्रत्येक झाडावर १५ ते २० आंबे लागलेले रंगीत फोटो राजस्थान पत्रिका या दैनिक अंकातून प्रसिद्ध झाल्यावर अनेक शेतकऱ्यांचे फोन आले. वृत्तपत्रातील फोटो पाहून अनेकजण म्हणाले 'झाडाला हे प्लॅस्टिकचे आंबे लावले आहते काय ? '

लागवड पद्धत : आम्ही प्रथम नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील उत्कृष्ठ डाळींबाच्या झाडावरील गुटी कलमापासून तयार केलेली रोपे घेऊन २५ ऑगस्ट २०१२ रोजी गुटी कलमाची लागवड केली.

लागवड करण्याची पद्धत: या भागामध्ये जमीन रेतीयुक्त व उधईचे (वाळवी) प्रमाण जास्त असल्यामुळे लागवड करतेवेळी १ x १ x १ फूट याप्रमाणे खड्डे घेऊन त्यामध्ये शेणखत, कल्पतरू खत, क्युरॉक्रॉन, पालापाचोळा मातीत मिक्स करून खड्डे भरून घेतले. साधारणत: १२' x १०' अंतराने १३५० रोपांची लागवड करतेवेळी जर्मिनेटर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम ५० लि. पाण्यामध्ये टाकून रोपे या द्रावणात ५ मिनिटे बुडवून लागवड केली. यामुळे उधईचा प्रादुर्भाव झाला नाही. मर फक्त २% झाली. रोपे जोमदार वाढली.

पाणी देण्याची पद्धत : १२' x १०' अंतरावरावरील या बागेला ड्रिप पद्धतीने पाणी दिले जाते. तरी जमीन वालुकामय असल्यामुळे अधूनमधून वाऱ्याने माती व वाळू उडते. याकरिता रेनगन पद्धतीने पाणी दिले जाते. त्याच्यामुळे वालुकामय जमीन ओली राहून वाळूमिश्रीत माती उडत नाही, धूप थांबते.

जात (भगवा) : या भागात भगवा या जातीची निवड करण्याचा उद्देश असा की, प्रतिकूल परिस्थितीत मात करण्याची क्षमता या जातीमध्ये आहे. तसेच निर्यात करण्यासाठी देखील ही जात उत्तम आहे.

फवारणी : लागवड केल्यानंतर दर १५ दिवसाला सप्तामृत औषधाची फवारणी केली. अधून मधून रोगाचा व किडीचा प्रादुर्भाव पाहून किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी केली. साधारणत: झाड सहा महिन्याचे झाल्यानंतर छाटणी केली. दर महिन्याला ड्रिपमधून जर्मिनेटर देत गेलो. पुढील सहा महिन्यात तीन वेळा छाटणी केली. साधारण: मधल्या कालावधीत शेणखत, कल्पतरू खत, सुक्ष्म अन्नद्रव्ये, रासायनिक खत, निंबोळी पेंड, क्युरॅक्रोन पावडर असे दर सहा महिन्याला दोन डोस देऊन बहाराची तयारी केली.

बहार धरणे : एक महिन्याअगोदर बागेस ताण देऊन स्टोअरेज (गर्भधारणा) होण्यासाठी १८:४६, राईपनर, ००:५२:३४, सुक्ष्मअन्नद्रव्याच्या (ताण अवस्थेस) दोन फवारणी केल्या. १ जून २०१४ रोजी बहार छाटणी करून १५ जून २०१४ रोजी पानगळीसाठी इथ्रेल अर्धा मिली + प्रोफेक्स किटकनाशक ३ मिली + ००:५२:३४ हे ५ ग्रॅम, १ लि. पाणी याप्रमाणे फवारणी घेऊन साधारणत: २२ जून २०१४ रोजी पहिले पाणी दिले व २३ जून २०१४ रोजी बोर्डोमिश्रणाची फवारणी केली. यामध्ये मोरचुद १ किलो + चुना १ किलो + सल्फर ७५ ग्रॅम + १०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली.

२५ जून २०१४ रोजी जर्मिनेटर व प्रिझम प्रत्येकी १ लि. + २०० ली. पाणी याप्रमाणे काडीवर फवारणी केली. यामुळे जाड काडीपासून छोट्या काडीपर्यंत ९०% डोळे निघाले. त्यामुळे जाड काडीला भरपूर माल निघाला. साधारणत: १० जुलै २०१४ रोजी तांबुस कलरची पत्ती असताना थ्राईवर ५ मिली. क्रॉपशाईनर ५ मिली. कॅनटॉंप १ मिली, रिझेन्ट १ मिली, १ लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. उष्णता जास्त असल्यान आणि या औषधामुळे कळी जास्त प्रमाणात निघाली. किडीचा प्रादुर्भाव झाला नाही.

२० जुलै २०१४ सप्तामृत प्रत्येकी २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. यामुळे प्लॉट मध्ये फ्लॉवरिंग व सेटिंग अवस्थेमध्ये मधमाश्यांचे प्रमाण अधिक होते. फुलकळी कॅप्सुलसारखी मिळाली व या भागामध्ये नर फुलांची संख्या जास्त निघते अशा परिस्थितीत नर व मादी फुलांचे ५० - ५०% प्रमाण होते. पहिल्या बहाराला प्रत्येक झाडावर ७० ते ८० फळांचे सेटिंग झाले. ड्रिपमधून प्रत्येक महिन्याला सर्व प्लॉटला जर्मिनेटर ५ लि. ड्रिपमधून दिले. सेटिंग झाल्यानंतर १०:२६:२६ (५०० ग्रॅम ) १८:४६ (५०० ग्रॅम ), कल्पतरू (१ किलो), सुक्ष्मअन्नद्रव्य (१०० ग्रॅम), निंबोळी पेंड (५०० ग्रॅम) प्रति झाड याप्रमाणे भेसळ डोस भरला. यापुढे दर १५ दिवसाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व किटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी केली.

१३ नोव्हेंबर २०१४ रोजी फळाची साईज २५० ते ३०० ग्रॅम आहे. यापुढे थंडीचे प्रमाण वाढत असल्यामुळे पहाटे पाणी देण्याचा सल्ला दिला. बोअरवेलचे पाणी कोमट असते. तसेच ४ दिवसाला न्युट्राटोन ५ लि. ३ वेळेस ड्रिपमधून देण्यास सांगितले, तसेच १५ दिवसाला सल्फर, बोरॉन, कॅल्शियम देण्यास व क्रॉपशाईनरचे प्रमाण फवारणीतून वाढविण्यास सांगितले. त्यामुळे फळगळ होणार नाही. थंडीमध्ये फळांना क्रॅकींग होणार नाही. तसेच फळे तजेलदार राहतील. हे सर्व तंत्रज्ञान सटाणा कृषी विज्ञान केंद्रातील कंपनीचे सल्लागार श्री. संतोष ढगे यांच्या सल्ल्याने चालू आहे. ते दर महिन्याला आमच्या प्लॉटवर येऊन पीक परिस्थितीनुसार मार्गदर्शन करतात. आमचा प्लॉट पाहून आजूबाजूचे शेतकरी डाळींब लावण्यास उत्सुक आहेत. तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कंपनी ने राजस्थानसाठी विचार करावा, हीच इच्छा !