गारपिटीने उद्ध्वस्त झालेला केळी बाग डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त होऊन मालाचा दर्जा व उत्पन्नात भरीव वाढ !

श्री. जगन्नाथ डी.राठोड, २१, सुयोगनगर, रिंगरोड, नागपूर - ४४००१५. मोबा. ९८९०७०६९०९

केळीपीक घेण्याचे प्रयोग पुर्णपणे फसलेल्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील पारडी या गावी लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालयात मुख्य लेखाधिकारी म्हणून काम करणारे अच्चशिक्षीत धाडशी आणि शेतीवर निष्ठा असणारे डॉ. एकनाथ चौधरी यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केळी लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला.

मी २०१३ सालच्या भिषण पावसानंतर अत्यंत विपरीत परिस्थितीत जैन इरीगेशनच्या ५००० टिश्यू कल्चर रोपांची लागवड केली. प्रतिकूल हवामानामुळे येणाऱ्या रोगावर मात करत जानेवारी २०१४ मधील गारपीट आणि वादळाचा तडाखा सोशीत, १०% बाग उद्धवस्त झाल्यानंतर देखील सर्व मजुर, धाकटे बंधू आणि मला देखील डॉ. चौधरींनी प्रोत्साहित केले. उत्साह कायम ठेवीत सर्व कामाला लागलो आणि योग्य फळ मिळून जुलैमध्ये घड निसवायला सुरुवात झाली. परंतु खत व्यवस्थापन योग्यरित्या करूनदेखील घड जोपासण्याची व फळांचा आकार वाढण्याची शक्यात दिसत नव्हती. म्हणजे डोळ्यात भरेल अशी क्रांती दिसत नव्हती. त्यातच भरघोस पीक घेणाऱ्या भागातील केळी पीक घेणाऱ्या मित्राला बाग दाखवली तर त्यांनी बागेला शुन्यच मार्क देण्याचे जाहीर केले. नैराश्य आले, वाईत वाटू लागले. पण डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा अभियंता म्हणून थोडासा अभ्यास होता. त्यानुसार त्यांचे पुणे कार्यालयाशी संपर्क साधला आणि नागपूर विभागालीत सल्लागार व कंपनीचे प्रतिनिधी श्री अंकुश वराडे यांना गाठले. त्यांनी बागेला भेट दिली, बाग पाहून त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केले आणि योग्य अडचण ओळखून राईपनर दिड लिटर + हार्मोनी ६०० मिली + न्युट्राटोन दिड लिटर + २०० लि. पाण्यामध्ये घेवून फवारणी करण्यास सांगितले. त्यानंतर आठ दिवसात तर चित्रच बदलले आणि जणू काही बागेवर चमत्कारच दिसून आला. वराडेंनी 'काळजी करू नका' डॉ. बावसकर तंत्रज्ञान तुमच्या सोबात आहे असे अगोदरच सांगितले होते. त्यांच्या शब्दाने काळजीच निघून गेली आणि १० दिवसांत जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे घडांचे तेज, लांबी, आकार, वजन वाढून घड डोळ्यात भरण्यासारखे झाले. १ महिन्यापुर्वी येवून गेलेल्या व्यापाऱ्यांना फोन करून बोलावले. माल घेण्याबद्दल सुरुवातीला का - कू करणाऱ्या व्यापाऱ्यांनी माल नं. ०१ असल्याचा व उद्यापासून माल काढायला सुरुवात करू असे सांगून भुसावळला जाहीर होणारा भाव देवू अशी हमी दिली आणि आज दि. १२ नोव्हेंबर २०१४ रोजी माल काढायला सुरुवात होत आहे. म्हणजे बरोबर ३६१ दिवसात मालाचे पैसे हातात यायला सुरुवात होत आहे.

आता खोडवा पिकाचे पूर्ण नियोजन डॉ. बावसकर तंत्रज्ञानानुसार करण्याचा निश्चय आणि निर्धार केला आहे.

Related New Articles
more...