काळ्या जमिनीतील शेवग्याच्या समस्या व उपाय!

श्री. शरद बाबाजी मेंगडे,
मु.पो. गलांडगाडी, ता. इंदापूर, जि. पुणे.
मोबा. ७०५८३३३८११३० गुंठ्यामध्ये १०' x ८' वर फेब्रुवारी २०१४ मध्ये कोईमतूर जातीचा शेवगा लावला आहे. आज आठ महिन्याच्या या रू. ३५० झाडांपैकी २०० झाडांवर शेंगा लागल्या आहेत. त्यापैकी ७०% झाडांवर हिरव्या व लालसर शेंगा निघत आहेत. सरांनी सांगितले, काळी जमीन असल्याने खाली चुनखड असणार आहे. थंडीत ८ दिवसांनी पाणी द्या. तसेच झाडाचे जवळील इंडात पाणी द्यायचे नाही. त्यामुळे फुले लागत नाही. त्याच्या बाजूला दुसरा दंड आहे, त्यामध्ये पाणी द्याव.

जेव्हा अंतर ६' x ५' किंवा ५' x ५' असते तेव्हा झाडांची संख्या जास्त झाल्यावर लाग (फुले) भरपूर लागतो, असा नवीन अनुभव आहे. जेव्हा ठिबकने पाणी द्यावे लागते. तेव्हा ठिबकने ठराविक प्रमाणात भारनियमन पाहून अचूक प्रमाणात पाणी बसते. त्यामुळे जादा पाण्याचे शेवग्यावरील दुष्परिणाम टाळते जातात. म्हणजे महाराष्ट्र इलेक्ट्रिसीटी बोर्डाचा भारनियमनांचा 'शाप' हा शेवगा पिकाला 'वरदान' ठरत आहे.

खराब हवामानामुळे व पावसामुळे झाडांची भरमसाट वाढ, त्यामुळे छाटणी जमली नाही

मागच्या १ ते १।। महिन्यात हवामानात प्रचंड बदल झाला. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला, त्याकाळात छाटणी करू शकलो नाही. जमिनीत अधिक ओल झाल्याने झाडे डोक्याएवढी झाल्यावर उशीरा शेंडा छाटला. सरांनी वरील समस्येवर प्रमुख ३ कारणे सांगितली. एक म्हणजे वेळेवर छाटणी न होणे, दुसरे पाणी जास्त होणे आणि तिसरे हवामानात झालेले बदल ! त्यामुळे नुसतीच झाडे माजली व फुले लागली नाहीत. शेंगा वेड्यावाकड्या व लालसर झाल्या आहेत. सरांनी सांगितले, ज्यावेळेस हवेत गारठा व तापमानात फरक असतो तेव्हा फुलगळ होते. काही फुले फुलतात पण देठाची काडी सुकून गळतात. तसेच जेव्हा पाणी अतिरिक्त दिले जाते. तेव्हा फुलांचा दांडा पिचपिचीत होतो व देठापासून फूल वेगळे होते. बऱ्याच ठिकाणी पाटाने पाणी दिले गेले व निसर्गाने आपला कोप दाखविला. त्यामुळे अवकाळी पाऊस पडला. त्याचा सर्वच पिकांवर दुष्परिणाम झाला. औषधे फवारूनही फारसा फरक पडत नाही. जसे सर्दी झालेल्या मुलाला आई डॉक्टरांकडे घेऊन जाते. मात्र त्यानंतर आई जेव्हा कपडे किंवा भांडी धुताना त्या पाण्यात ती मूल हात मारतो, पाण्यात खेळते. तेव्हा औषध देऊनही आजार बरा होत नाही, पाण्यात खेळते. तेव्हा औषध देऊनही आजार बारा होत नाही. म्हणून आई पुन्हा डॉक्टरांकडे जाते. तेव्हा त्या बाळाची पुन्हा तपासणी करून डॉक्टर विचारतात, मुल पाण्यात खेळते का ? तेव्हा आई हो म्हणते, मग सर्दी कशी बरी होणार ? अशीच अवस्था या शेवग्याची झाली आहे. अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस अती पाणी व अवकाळी पाऊस होतो, तेव्हा पांढरीमुळी मुकी होते, पानगळ होतो, झाडे निस्तेज होतात, फुल लागत नाही, शेंग पोसत नाही, तेव्हा मुकी झालेली पांढरी मुळी चालण्यासाठी जर्मिनेटर १ लि., प्रिझम १ लि., क्रॉपरऑक्सी क्लोराईड ५०० मिली हे २०० लि. पाण्यातून ठिबकमधून (व्हेंच्युरीतून) अथवा पाटाने बाऱ्याजवळ सोडणे किंवा या शेवग्याचे जे दांड आहेत त्या दांडातून म्हणजे ५० फूट लांबीच्या सरीला (दांडाला) जर्मिनेटर आणि प्रिझम ५ - ६ बुच (५० - ६० मिली) व कॉपरऑक्सीक्लोराईड ३ बुच (३० मिली) दांडातून सोडणे, म्हणजे पांढऱ्या मुळ्या वाढतील व कर्ब ग्रहणाची मंदावलेली क्रिया वेगाने होऊन फुल निघेल.

५०% पेक्षा जास्त शेंगा जांभळ्या निघत आहेत. सध्या तुम्ही आणलेल्या शेंगाची पाहणी, तपासणी केली असता असे जाणवते की, मातीत ऑरगॅनिक कार्बन, ईसी, पाणीधारण क्षमता (W. H.C.), मुक्त चुन्याचे (कॅल्शिअम कार्बोनेटर) चे प्रमाण जास्त आहे. तेव्हा पाणी दुपारी १२ ते ४ या वेळेत द्यावे. असे अनेक शेतकऱ्यांच्या अनुभावातून लक्षात आले. जेव्हा अती उष्णता असते तेव्हा सर्व पिकांना पाणी सकाळी १० च्या आत द्यावे. हा एक विरोधाभास लक्षात ठेवावा.

सरांनी विचारले, दांड पुर्ण भरता की अर्धे, तेव्हा आम्ही पुर्ण दांड भरून पाणी देतो असे सरांना सांगितले. सरांनी यावर सांगितले की, म्हणजे पाणी जास्त होतेय, अशाच प्रकारे शेवग्याला अॅड. खिलारे हे शेत पुर्ण ओलेगार होईपर्यंत पाणी देत व तेच त्यांचे चुकल्याने पहिला बहार वाया गेला. मात्र नंतर सरांच्या सल्ल्यानुसार एका आड एक दंडात पाणी दिल्याने शेवगा चांगला आला व अशी दक्षता घेतल्याने उत्पन्न चांगले आले. त्यामुळे त्यांनी सांगितले वकिली करण्यापेक्षा 'सिद्धीविनायक' शेवग्याची शेती देणे कष्टाचा पैसा व आत्मिक समाधान (संदर्भ : शेवगा पुस्तक पान नं. ४५) या पुस्तकाचा अवलंब करून सरांनी सांगितलेल्या मात्रांचा वापर करून लालसर शेंगा व वेड्यावाकड्या लूज शेंगा कमी होतात का ? तो प्रयोग करून पहावा व १० दिवसांनी ३ टप्प्यातील दक्षिणेकडील फुल, वाधी, ६ आणे आसरीच्या जाडीच्या शेंगा व करंगळीच्या आकाराच्या शेंगा दाखविण्यात आणणे आणि यात जर सुधारणा झाली तर १ महिन्यात सर्व प्लॉट सुधारण्याची शक्यता आहे आणि जर नाही झाली तर यामध्ये क्षार कमी करण्यासाठी धैंच्या लावून बळीराम नांगराने फुलोऱ्यात येताच कापून जमिनीत गाडावा. जेथे फुल नाही तेथे पेन्सिलच्या आकाराच्या फांद्या डोळ्यापर्यंत छाटाव्यात. छाटताना ही फांदी जांभळी ते तपकिरी रंगाची असावी.

छाटलेला हिरवा पाला अशक्त जनावरांना घालणे म्हणजे उस्मानाबाद येथील तानाजी जाधव मु. पो. तुतोरी. ता. उमरगा, जि. उस्मानाबाद यांनी सांगितले जादा राहिल्या जाड शेंगा जनावरांना दिल्या, तर ४ लि. दूध देणारी गाय वासराचे भागून ६ लि. दूध देऊ लागली. म्हणजे त्याप्रमाणे जनावरांना जर पाला दिला तर त्या नुसते दूध जास्त देणार नाहीत, तर जनावरांचेही आरोग्यही सुधारेल.