डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एकाच फवारणीत 'दिवाळीत' टोकलेल्या बियाला आलेल्या तुरीच्या शेंगास मुंबई मार्केटला ४०० रू/१० किलो

श्री. सुदर्शन संभाजी कोलते,
मु.पो. कोथळे, ता. पुरंदर, जि. पुणे,
मोबा. ९८५०८१७८१८


आम्ही गेल्यावर्षी दिवाळीत गावरान तूर २० गुंठ्यामध्ये २' x २' वर टोकली होती. जमीन मध्यम असून गरवी वाण होता. याला फुले लागल्यानंतर आमच्या गावातील एकाकडे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे पाहण्यात आली. त्यावरून माहिती घेऊन तुरीवर एकदाच जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट फवारले तर फुलगळ झाली नाही. परागीभवन चांगले होऊन फळधारणा चांगली झाली. कीड लागू नये म्हणून सायपरमेथ्रीन फवारले होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एका फवारणीवर शेंगा भरपूर लागून दाणे पोसले.

२० गुंठ्यात ८० हजार

शेंगाची ४० - ४५ किलोची ५० पोती मिळाली. ह्या तुरीच्या हिरव्या शेंगा थेट भाजीसाठी वापरल्या जातात. ती पुण्यात फारशी चालत नाही. मुंबई मार्केटला तिला जादा मागणी असते. मुंबई ला ४०० रू./ १० किलोस भाव मिळाला २००० किलो शेंगाचे ४० रू. प्रमाणे ८० हजार रू झाले आहे.

या अनुभवावरून ढोबळीसाठी आज (३ सप्टेंबर २०१४) माहिती व औषधे घेण्यास आलो आहे. ढोबळी १० गुंठ्यात मल्चिंग पेपर आणि तार काठीच्या आधारावर लावली आहे. लागवड २१ जून २०१४ ची असून १।। फूट उंचीची आहे. २ बेडमध्ये ३ फुटाचे अंतर आहे. ड्रीपच्या दोन्ही बाजुला लागवड आहे. प्लॉट उत्तम होतो. मात्र मधल्या रिकाम्या जागेत तण झाल्याने त्यावर तणनाशकाची फवारणी केली. तर त्याचा पिकावर दुष्परिणाम होऊन फुलगळ झाली, झाडांची मर होत आहे. एकूण ७ बेड आहेत. त्यापैकी २ बेडवरील २०% पेक्षा जास्त मर झाली आहे व ते प्रमाण वाढत आहे. त्यासाठी सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे. सरांना सांगितले. 'प्रिझम व कॉपरऑक्सीक्लोराईड प्रत्येकी ५०० मिलीचे १०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करणे आणि जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन, प्रोटेक्टंट, राईपनर, हार्मोनी (डावणीसाठी) फवारणे." सरांनी सांगितल्याप्रमाणे वरील औषधे घेतली आहेत. मला खात्री आहे की, ही औषधे वापरल्यावर ढोबळी पुर्णपणे पुर्ववत होऊन उत्पादन व दर्जात हमखास वाढ होईल.