अॅस्टरची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


वर्षाच्या तिनही हंगामात फुलणारी आणि नेहमी मागणी असणारी जी मोजकी फुलझाडे आहेत, त्यात अॅस्टर फुलांचा क्रम अगदी वरचा आहे. उन्हाळा असो, पावसाळा असो अथवा हिवाळा असो, अॅस्टरची फुले सहजासहजी उपलब्ध होतात. पुर्वी अॅस्टरची फुले सहजासहजी उपलब्ध होतात. पुर्वी अॅस्टरची फुले फक्त हारासाठीच वापरली जात, पण अलीकडे अॅस्टरची फुले हाराशिवाय पुष्पगुच्छ करण्यासाठी तसेच फुलांच्या लांब दांडीमुळे फुलदाणीमध्ये ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत.

फुलांचे विविध प्रकार आणि रंग तसेच फुलांचा टिकाऊपणा या गुणधर्मामुळे हे फूल लोकप्रिय झाले आहे. पुण्या - मुंबईखेरीज इतर लहान शहरांतूनसुद्धा या फुलांना मागणी असते. इतर फुलझाडांच्या तुलनेने अॅस्टरची लागवड सोपी, कमी खर्चाची असते. शिवाय पीक थोड्या दिवसात फुलते. त्यामुळे सामान्य शेतकरी या फुलाची शेती करण्यात उत्सुक असतो.

अ. क्र.   प्रकार   रंग व तपशिल  
१.   रामकाठी प्रकार   गुलाबी, जांभळी, पांढरी फुले  
२.   गरवा प्रकार   विविध रंगाची फुले, हंगाम ५ महिने  
३.   पावडर पफ प्रकार   विविध प्रकार, भरगच्च फुले आणि डेरेदार वाढ  
४.   ऑस्ट्रीय ब्लू प्रकार   आकर्षक निळ्या रंगाची आणि मोठ्या आकाराची फुले येणाऱ्या जाती.  
५.   निमगरवा   या जातींची वाढ मध्यम स्वरूपाची ४५ सें.मी. पासून ६० सें.मी. पर्यंत उंच वाढतात.
हंगाम १०० ते १२० दिवसात संपतो.  


हवामान : अॅस्टर पिकास फार कडक थंडी मानवत नाही. तसेच कडक ऊनही मानवत नाही. विदर्भातील उन्हाळ्याचा काळ आणि नाशिक परिसरात हिवाळ्याचा काळ, कोकणपट्टीत पावसाळ्याचा काळ वगळला तर महारष्ट्रात बाराही महिने अॅस्टर पीक घेता येते.

जमीन : भारी कसदार जमिनीत पिकांची वाढ जोमदार होते, पण फुलांचे उत्पादन मात्र खूप कमी येते. त्याशिवाय पावसाळ्यात पाण्याचा निचरा चांगला होत नसल्याने बऱ्याच वेळेला पीक हातचे जाते तेव्हा अशी जमीन अॅस्टरचे पिकासाठी निवडू नये. निकस आणि हलक्या जमिनीत पिकाची वाढ खुंटते. फुलेही लहान आणि निस्तेज निपजतात. तेव्हा अशी जमिनही निवडू नये. मध्यम पोयट्याची, उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडल्यास अॅस्टरचे पीक चांगले निपजते.

फुलांच्या जाती : फुलांच्या आकारावरून आणि कालावधीनुसार अॅस्टरच्या अनेक जाती/ प्रकार आढळतात. आपल्याकडील हवामानात पुढील जाती यशस्वी ठरलेल्या आहेत.

मागणी तसा पुरवठा : लग्नसराईत म्हणजे उन्हाळ्यात गर्द रंगाची आणि मध्य आकाराच्या फुलांची मागणी अधिक असते. गुलाबी, निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फुलांना अधिक पसंती असते. गणेश उत्सव, नवरात्र आणि दसरा, दिवाळी या काळात लाल, भगवा, निळा या रंगाच्या फुलांना चांगलीच मागणी असते. तर

काही प्रचलित जाती:

१.   आझूर ब्लू   झाड ६० सें.मी. उंच वाढते ८ - १० फांद्यावर मोठी निळ्या रंगाची फुले येतात.  
२.   रोझ पिंक   जोमदार आणि उंच वाढणारी जात. भरपूर पाकळ्यांची आणि गुलाबी रंगाची फुले येतात.  
३.   स्कारलेट सेटाईस   जोमदार वाढीची जात 
४.   न्यू बॉय   हळवी आणि बुटकी जात. फुले निळ्या रंगाची, मोठ्या आकाराची, फुलांच्या पाकळ्या
किंचीत कुरळ्या आकाराच्या असतात. झाडांची उंची सुमारे ५० सें.मी.  
५.   व्हाईट   कणखर उंच वाढणारी, पांढऱ्या रंगाची ही जात आहे.  
६.   डार्क ब्लू   या जातीची झाडे ५५ - ६० सें.मी उंच वाढतात, फुले मोठी आणि गर्द निळ्या रंगाची असतात.  
७.   रोझ   फुले गुलाबी रंगाची असून, झाडे कणखर असतात.  
८.   ब्लू स्काय   जा जातीची झाडे ५५ - ६० सें.मी उंच वाढतात, फुले मोठी आणि गर्द निळ्या रंगाची असतात.  
७.   रेझ   फुले गुलाबी रंगाची असून, झाडे कणखर असतात.  
८.   ब्लू स्काय   या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे आत वळलेल्या पाकळ्या आकर्षक आणि आक्षी निळ्या रंगाची फुले.  
९.   सुपर जाएंट पर्पल   झाडे ९० सें.मी. वाढतात, ८ - १० कणखर फांद्यावर टपोरी जांभळ्या रंगाची फुले येतात.  
१०   सुपर जाएंट व्हाईट   झाडे जोमदार आणि १ मीटर उंच असतात, फुले टपोरी पांढरी असतात.  
११   अर्लीचार्म मिक्स   झाडे ४५ सें.मी. उंच वाढतात. मिश्र रंगाची फुले म्हणून चांगली आहेत.  
१2   सुपर जाएंट क्रीमसन   या जातीची उंची ९० सें.मी. एवढी असते. फुले लालसर असतात.  
१३. संकरित बियाणेसुद्धा काही सीड कंपन्यांची उपलब्ध आहेत (नोव्हर्टिस, इंडो अमेरिकन हायब्रिय व परदेशी कंपन्या इत्यादी)


नाताळाच्या काकात पांढऱ्या रंगाच्या फुलांना अधिक उठाव मिळतो. याचा अर्थ वेगवेगळ्या जातीच्या, रंगाची फुले वेगवेगळ्या काळात अधिक खपतात. लागवड करताना ही बाजू समजून घ्यावी आणि त्याप्रमाणे जाती निवडाव्यात.

किति क्षेत्रावर लागवड करावी : उपलब्ध योग्य जमीन आणि पाणीपुरवठा याच बरोबर किती काळ पुरवठा करण्यात येईल. या बाबींवर भर द्यावा. आपणांस ५ एकर क्षेत्रावर लागवड करावयाची आहे, तर सगळे क्षेत्र एकाच वेळी न लावता तीन अगर चार टप्प्यात लावावे. म्हणजे फुले अधिक काळ बाजारात पाठविता येतील. अनेकदा असे दिसून येते की, ठराविक काळात बाजारात फुलांची रेलचेल होते व भाव कमी येतो. फुलांचा हंगाम विस्तारीत केल्यामुळे हा धोका काम होते.

लागवडीची पूर्व तयारी : अॅस्टरची लागवड रोपे तयार करून केली जाते. त्यापूर्वी जमिनीची मशागत करून आणि सेंद्रिय खतांचा पुरवठा करून जमीन सपाट करावी. नांगरणी, कुळवणी नंतर एकरी ४ ते ५ टन चांगले कुजलेले कंपोष्ट खत अथवा शेणखत, १५० ते २०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत वापरावे. अगोदर हिरवळीचे खत किंवा द्विदल पिकाचा बेवड साधता आल्यास उत्तम ठरते. लागोपाठ त्याच त्याच जमिनीत अॅस्टरचे पीक घेणे टाळावे. मेथी, घेवडा, कोथिंबीर, वाटाणा अशी भाजीपाल्याची पिके तसेच भुईमूग, उडीद, हरभरा, करडई यासारखी पिके. अॅस्टरसाठी फेरपालटीची पिके घेण्याचा प्रयत्न करावा. जमिनीची पूर्व - मशागत आटोपताच सारे वाफे तयार करावेत. या वाफ्यांवर रोपे लावावीत.

अॅस्टर लागवडीचे नियोजन : लागवडीस रोपे केव्हाही लावता येतात. म्हणून लागवड केली तर मात्र समाधानकारक उत्पन्न मिळणार नाही. मागणीनुसार पुरवठा करता आला पाहिजे आणि त्याचबरोबर फुलांचा दर्जा सांभाळत आला पाहिजे. त्यासाठी लागवडीचे नियोजन अतिशय आवश्यक आहे. नियोजन करताना लाग्वाडीचा हंगामा, मोजक्या जातींची निवड. लागवडीचे क्षेत्र, पाण्याची उपलब्धता या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा.

लागवडीची वेळ   हळव्या पिकांचा हंगाम   गरव्या पिकाचा हंगाम  
जानेवरी - फेब्रुवारी   एप्रिल - मे   जून - जुलै  
मे - जून   ऑगस्ट - सप्टेंबर   ऑक्टोबर - नोव्हेंबर  
जुलै - ऑगस्ट   नोव्हेंबर - डिसेंबर   जानेवारी - फेब्रुवारी  
सप्टेंबर - ऑक्टोबर   जानेवारी - फेब्रुवारी   मार्च - एप्रिल  


रोपे तयार करणे - हव्या त्या जातीचे बी मिळवून योग्य अवस्थेत रोपांची लागवड करणे हमखास उत्पादनासाठी गरजेचे आहे. खात्रीचे बी मिळविण्यात अडचण येते. अशावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरच बी अगर एखाद्या गावातील ३ - ४ शेतकऱ्यांनी व्यवस्थित बी राखले तर त्या गावातील संपूर्ण गरज गावातच भागली जाईल. तसेच वेळेवर बी उपलब्ध झाल्यामुळे वेळेवर आणि ठरल्याप्रमाणे आपणास हव्या असलेल्या आकाराच्या आणि रंगांच्या जातींच्या झाडांना ती फुलावर येताच राखून ठेवून बी करावे. एक वर्षापेक्षा अधिक जुने बी रोप करण्यासाठी वापरू नये. बी पेरण्यापुर्वी ते जर्मिनेटर २५ मिली + ५०० मिली पाणी घेवून त्यात २५० ग्रॅमपर्यंत बी रात्रभर भिजवत ठेवावे. दुसऱ्या दिवशी बी सावलीत सुकवून ते गादी वाफ्यावर ओळीत पेरावे. एरवी बी पेरल्यापासून सुमारे वाफ्यावर ओळीत पेरावे. एरवी बी पेरल्यापासून सुमारे ३० - ४० दिवसांनी रोपे लागवडीस येतात. मात्र जर्मिनेटरच्या प्रक्रियेमुळे रोपे २५ ते ३० दिवसातच लागवडीस येतात. रोपे लावण्यापुर्वी रोपांची मुळे जर्मिनेटर येतात. रोपे लावण्यापुर्वी रोपांची मुळे जर्मिनेटर १० मिली + बुरशीनाशकाच्या (बाविस्टीन १ ग्रॅम) १ लि. पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत. एक हेक्टर क्षेत्र लावणेसाठी १ किलो बियाणे पुरेसे होते.

रोपांची लागवड : अॅस्टरच्या रोपांची लागवड जमिनीच्या जातीप्रमाणे, मगदुराप्रमाणे आणि हंगामाप्रमाणे रोपारोपांत अंतर राखून आणि एका ठिकाणी एकच रोप लावून करावी. सामान्यपणे पुढीलपैकी एक अंतर ठेवावे.

१) ३० सें. मी. x २० सें. मी.

२) ३० सें. मी. x ३० सें. मी.

३) ४५ सें. मी. x ३० सें. मी.

अ) आंतरमशागत आणि निगा : रोप लावण्यापुर्वी खुणा करून खुरप्याने खड्डा करून तेथे कल्पतरू सेंद्रिय खताची मात्रा द्यावी. यासाठी एकरी १०० किलो कल्पतरू द्यावे.

३० x २० सें.मी. अंतरावर लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. पावसाळ्यात भारी जमिनीत ४५ ते ६० सें.मी. अंतरावर सऱ्या काढून लागवड करावी. सरीच्या दोन्ही बाजूस २० ते २५ सें.मी. अंतरावर रोपे लावावीत.

लागवडीनंतर ४ -५ आठवड्यात एक खुरपणी करून १० किलो मॅग्नेशियम सल्फेट मिसळून द्यावे. गरव्या प्रकारात अशाच प्रकारचा एक हप्ता फुले लागणीच्या अगोदर द्यावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे, हंगामानुसार ५ - ६ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.

पीक संरक्षण :अॅस्टर या फुलामध्ये प्रामुख्याने मावा, कळी पोखरणारी अळी, खोड पोखरणारी अळी व नाग अळी या किडी आढळतात. तसेच मूळकुज व मर हे प्रमुख रोग दिसून येतात.

क्र.   किड/रोग   लक्षणे   नियंत्रण  
१   मर   रोपाच्या शेंड्याची वाढ खुंटते पाने पिवळी पडतात व रोप मरते.   बाविस्टीन २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात ड्रेंचिंग घ्यावे.
कॉपटाप दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात ड्रेंचिंग ग्यावे.  
न्युऑन, १.५ मि. ली. प्रतिलिटर पाण्यात फवारावे.
क्लोरोपायरीफॉस १.५ मि. ली. प्रतिलिटर पाण्यात फवारावे रोगार २ मि. ली. प्रतिलिटर पाण्यामध्ये फवारावे.
२   मुळकुज   रोपांची मुळे कुजतात व रोप मरून पडते. रोपांचे मुळे तांबूस होतात  
३   मावा   पानातील रस शोषल्यामुळे पाने पिवळसर दिसतात  
४   नागअळी   पानांवर नागमोडी रेषा दिसून येतात  
५   कळी   अळी कळी मध्ये अंडी घालते. त्यामुळे पोखरली जाऊन नुकसान होते  
६   खोड पोखरणारी अळी   खोड पोखरल्यामुळे पाने पिवळी पडून रोप मरते.  


वरील कीड रोगांना प्रतिबंधक व प्रभावी उपाय तसेच उत्पादन व दर्जा सुधारण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १५ ते २१ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी २०० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० ते ६०० मिली + थ्राईवर ७५० मिली + क्रॉंपशाईनर ७५० मिली + राईपनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ७५ ते ८० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ५०० मिली + न्युट्राटोन ५०० मिली + प्रिझम ५०० मिली + प्रोटेक्टंट १ किलो + हार्मोनी ४०० मिली + स्प्लेंडर ४०० मिली + २५० लि.पाणी.

तोडे चालू झाल्यानंतर दर १५ दिवसांनी वरील फवारणी क्र. ४ प्रमाणे नियमित फवारण्या कराव्यात.

फुलांची काढणी : जातीनुसार अॅस्टरची ६५ ते ८० दिवसांत काढणी सुरू होते. पूर्ण वाढलेली आणि उमललेली फुले १० ते २० सें.मी. लांब दांड्यासह कापून प्रतवारी करून ४ ते ६ दांड्याची एकत्र जुडी बांधावी आणि विक्रीसाठी पाठवावी. एक हेक्टर क्षेत्रामधून अॅस्टरचे सरासरी १।। ते २ लाख जुड्यांचे उत्पादन मिळते. काढणी करताना फुलांचे दांडे प्लॅस्टिक बादलीतील पाण्यात बुडवून ठेवणे. फुले तोडल्यानंतर उन्हात ठेवू नयेत, अथवा फुलांवर पाणी शिंपडू नये. अशाप्रकारे अॅस्टर पिकापासून ४ ते ५ महिन्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळविणे शक्य होते.