अत्यंत कमी पाण्यावर रोगट पपई पुर्ण निरोगी, ११०० झाडांपासून २० - २५ % मालाचे १ लाख २० हजार

श्री. बाबुराव रामदास गावडे,
मु.पो. शेलवड, ता. बोदवड, जि. जळगाव - ४२५३१०,
मो.:९७३०७१३७०४


गेल्यावर्षी पुण्यामध्ये कृषी प्रदर्शन पाहण्यास आलो होतो तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. त्यावेळी लगेच 'कृषी विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरून मासिक चालू केले. त्यामुळे दर महिन्याला मला घरपोच मासिक मिळू लागले.

आम्ही यावर्षी १९ फेब्रुवारी २०१५ ला मध्यम प्रतिच्या २ एकर जमिनीत ८ x ६ फुटावर तैवान ७८६ वाणाच्या पपईची लागवड केली आहे. लागवडीच्यावेळी रासायनिक सिंगल सुपर फॉस्फेट व पोटॅश दिले होते. पाणी ठिबकने देत होतो. लागवडीनंतर मार्च - एप्रिलमध्ये जसजसे तापमान वाढू लागले. तशी पपईची मर होऊ लागली. २ एकरात एकूण १६०० रोपे लावली होती. त्याची मर होऊ लागल्याने रासायनिक व पारंपारिक उपाय योजना केली, मात्र मर आटोक्यात येईना. यामध्ये ४०० ते ५०० रोपे मेली. हे पपईचे पीक आम्ही पहिल्यांदाच केले असल्याने काय करावे समजेना. अनुभव नव्हता कृषी विज्ञानमधून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या रिझल्टबद्दल बरेच वाचण्यात आले होते. त्यामुळे या पपईस प्रतिनिधींकडून माहिती घेऊन जामनेरचे भुमिपुत्र अॅग्रो यांचेकडून जर्मिनेटर व सप्तामृत औषधे आणली. लगेच एकरी १ लि. जर्मिनेटर ड्रिपवाटे देऊन थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोनची फवारणी केली तर तिसऱ्या दिवशी मर पुर्णपणे थांबलेली दिसून नवीन फुट निघत असल्याचे दिसले. पानांना काळोखी व तजेलदारपणा दिसू लागला. एवढ्या अनुभवानंतर मात्र नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वेळापत्रकानुसार फवारण्या घेऊ लागलो. त्यामुळे पुढे कोणत्याही रोग - किडीचा प्रादुर्भाव झाला नाही. व्हायरस अजिबात नव्हता. वाढ झपाट्याने झाल्याने जुनमध्ये फुलकळी लागून ऑगस्टला फळांचे तोडे चालू झाले. पहिल्या तोड्याला ७ क्विं. पपई निघाली. नंतर १५ दिवसांनी दुसऱ्या तोड्याला १० क्विंटल., तिसऱ्या तोड्याला १८ क्विं. असा पहिल्या ३ तोड्यामध्ये ३५ क्विं. माल निघाला आणि ३ नोव्हेंबरला ४ थ्या तोड्याला ८५ क्विं. पपई मिळाली. आता काढणीचा माल वाढू लागला आहे. प्रत्येक तोड्याला सप्तामृत फवारणी करीत आहे. ठिबकवाटे ०:०:५०, ०:५२:३४ एकरी ४ किलो १५ दिवसाला देत आहे.

४ तोड्याचा मिळून एकूण १२० क्विं. म्हणजे १२ टन माल निघाला असून दिल्ली, पंजाबचे व्यापारी जागेवरून स्वत: मालाची काढणी, पॅकिंग करून १० रू./किलो भावाने पपई नेतात. फळे साधारण १ ते १.५ - २ किलोची असतात.

आमच्या भागात पाऊस फारच कमी म्हणजे २ च पाऊस झाले. लोकांनी बाजरी पेरली तर त्या कणसांमध्ये दाणेदेखील भरले नाहीत. एवढी तिव्र पाणी टंचाई असताना आम्हाला कमी पाण्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मोलाची साथ दिली. आमच्या विहीरीचे देखील पाणी कमी झाल्यामुले स्वखर्चाने मित्राची विहीर १० फूट खोल खोदून दिली व तेथून पाईपलाईनने पाणी आणून आमच्या विहीरीत सोडून नंतर बागेला दिले.

कमी पाणी असूनही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यांमुळे पाने टवटवीत हिरवीगार. रुंद असून फळांचे पोषणही चांगल्याप्रकारे होत आहे. या बागेतील आतापर्यंत २० ते २५% च माल निघाला असून ७५ ते ८०% माल अजून बाकी आहे. आतापर्यंत १२ टनाचे १ लाख २० हजार रू. झाले. हे उत्पन्न २ एकरमधील १६०० झाडांपैकी ११०० झाडांचेच आहे. मागील राहिलेल्या मालाचे अजून ४ - ५ लाख रू. सहज होतील असा अंदाज आहे. हे सर्व अत्यंत कमी पाण्यावर प्रतिकुल परिस्थितीत पहिल्याच प्रयोगात केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने साध्य होत आहे.