६२० 'सिद्धीविनायक' मोरींगा शेवग्यापासून एका वर्षात २ बहारात मिळविला ५ टन माल, १ लाख १८ हजार रू. निव्वळ नफा

श्री. राजेंद्र भागवत सुरळकर,
मु.पो. केकत निंभोरा, ता. जामनेर, जि. जळगाव.
मो. ९१५८७१०५८२आम्ही गेल्यावर्षी कपाशी लावली होती. तिचा एकरी ८ क्विं. उतारा मिळाला. मग कपाशी काढून १ एकरमध्ये ८ x ८ वर खड्डे खोडून त्यामध्ये शेणखत, कल्पतरू सेंद्रिय खत भरून १ जानेवारी २०१५ ला 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड केली. एकूण ६५० झाडे आहेत. याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या व छाटणीचे तंत्र पुस्तकात दिल्याप्रमाणे व आपले जमानेरचे प्रतिनिधी श्री. रविंद्र चौधरी (मो. ७०३८२३१९४५) यांच्या मार्गदर्शनानुसार अवलंबले.

जुनमध्ये शेंगा लागल्या. सुरूवातीला २५ झाडांपासून शेंग सुरू झाली. नंतर वाढत ३५० झाडांपासून सध्या शेंगा सुरू आहेत. गावातील हा पहिलाच शेवग्याचा प्रयोग आहे. त्यामुळे शेवगा लागवड व व्यवस्थापनाबाबत कोणालाच विशेष ज्ञान नाही. आम्ही ऑक्टोबर २०१५ अखेरपर्यंत ७० ते ८० हजार रू. च्या शेंगा विकल्या. जळगाव आणि भुसावळ मार्केटला लिलावात शेंगा विक्री करतो. जळगावला ७० ते ८० रू. / किलो भाव मिळाला. भुसावळला माल नेला तेव्हा जास्त शेंगा होत्या. तरी ४० रू. ने गेल्या. शेंग २ ते २।। फूट लांबीची, मध्यम जाडीची, गरयुक्त असून कलर हिरवा आहे. त्यामुळे लिलावात भाव चांगले मिळतात. शेंगा अतिशय चविष्ठ असल्यामुळे गावात एवढी मागणी आहे की ६० ते ७० रू. ने जागेवरून नेतात. आता सध्या आमच्या इकडे ढगाळ वातावरण आहे. आळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ती पाने व फुले खात आहे. त्यासाठी २ - ३ प्रकारची रायायनिक किटकनाशके वापरली मात्र कीड आटोक्यात आली नाही. आता ढगाळ वातावरण निवळले की २ - ३ दिवसांनी पुन्हा सप्तामृताची फवारणी घेणार आहे. पारंपारिक पद्धतीने आम्ही गेल्यावर्षी ४७०० श्रीमंती केळीचे बेणे (कंद) लावले होते. त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरा असे प्रतिनिधींनी सांगितले. मात्र आम्ही प्रथम शेवग्यावर प्रयोग करू म्हटले. सध्या ही केली कापणीला आली आहे. मात्र तिच्यावर एली २ - ३ महिन्यापासून रोग असल्याने १४ ते १८ किलोचीच रस मिळेल. मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरावेसे वाटत होते. मात्र ही केळी बटाईने केली असल्याने दुसऱ्याला ते पटत नव्हते.

आता ऑक्टोवर अखेरीस आम्ही आमच्या घरच्या शेतात लक्ष्मी केळीचे १२०० बेणे लावले आहे. याला सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरात आहे. कंद जर्मिनेटरमध्ये बुडवून लावल्याने १० - १२ दिवसात उगवण चांगली झाली आहे. आता पुढील फवारण्यादेखील चालू करणार आहे.

याचे बेणे मुक्ताईनगर येथून आणले. प्लॉटमधील बेणे आणले तीची ३० किलोची रास (घड) होते. तसेच या केळीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार असल्यामुळे कमीत कमी २५ पासून ३५ किलोपर्यंतची रास मिळेल.

आपला शेवगा बधून गावातील ४ - ५ शेतकरी 'सिद्धीविनायक' शेवगा लागवड करण्याच्या तयारीत आहेत. वाशिम मार्केटला शेवग्याला बाजार ६० ते ७० रू. किलो मिळत असल्याचे मित्राकडून समजले. त्याच्या साल्याचा पाचोऱ्याला 'सिद्धीविनायक' शेवग्याचा प्लॉट आहे तो आम्ही पाहण्यास जाणार आहे त्यांच्याकडून माहिती घेऊन जळगाव, भुसावळ नंतर वाशिम मार्केट चालू करणार आहोत.