डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सोयाबीनचा वाढ खुंटलेला प्लॉट प्रतिकूल परिस्थितीत २० गुंठ्यातून ६ क्विंटल उत्पन्न

श्री. वैभव बाळगोंडा पाटील,
मु.पो. वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ४१६१२२.
मो. ९६५७१८१३१९


नमस्कार, मी वैभव बाळगोंडा पाटील, मौजे वडगाव गावचा रहिवासी आहे. आमची स्वत:ची १ एकर जमिन आहे. त्यातील २० गुंठ्यामध्ये मी सोयाबीन पीक घेतले होते. त्याची उंची खुटलेली होती. त्यामुळे मी त्याच्यावर उपाय पाहण्यास सुरवात केली. त्यामुळे मी त्याच्यावर उपाय पाहण्यास सुरवात केली. त्यावेळी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, कोल्हापूरचे प्रतिनिधी अविनाश सावंत यांची भेट झाली. त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर करण्यास सांगितला. मी २ दिवसांच्या अंतराने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या थ्राईवर, क्रॉपशानर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन यांची फवारणी घेतली. त्यामुळे माझा वाढ खुंटलेला सोयाबीनचा प्लॉट पंधराच दिवसात पूर्ण वाढ झालेला दिसला. सोयाबीनची उंची गुडघ्याच्या वर आली. त्यामुळे पुढील फवारण्याही केल्या. त्यामुळे फुलकळीचे व शेंगाचे प्रमाण वाढले. त्यात अचानक आळीचा व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीबरोबर कोराजनची फवारणी घेतली. त्याने कीड आटोक्यात येऊन शेंगातील सर्व दाण्यांचे पोषण चांगले झाले. सर्व सोयाबीन एकावेळी काढणीस तयार झाले. याची मळणी केली असता २० गुंठे क्षेत्रातून तब्बल ६ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले. मी प्रथमच एवढ्या कमी खर्चात एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळविले आहे.

मी एका खाजगी कंपनीमध्ये जॉब करून शेती करतो. त्यामुळे मला शेतीस जास्त वेळ देता येत नाही. तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे माझा वेळ व पैसा वाचून जास्त उत्पादन मिळाले, त्याबदल मी सरांचे आभार मानतो व येथून पुढे मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा माझ्या पूर्ण १ एकर क्षेत्रावर वापर करणार आहे.