कीड - रोगाने गेलेल्या झेंडूच्या प्लॉटने दिला १।। लाख नफा

श्री. अंकुश माणिक कुबेर, मु.पो. अकोले (खु.), ता. माढा. जि. सोलापूर ४१३२११,
मो.: ९९७०९५७८९७


आम्ही गेली १२ - १५ वर्षापासून उसामध्ये झेंडूचे आंतरपीक घेतो. अनुभव दांडगा असल्याने पिकाचे व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करून चांगले पैसे होतात. चालूवर्षी इंडोस कंपनीच्या केशरगोल्ड वाणाची १६५०० रोपे ३ रू. प्रमाणे आणून ५ x १।। फुटावर ३ एकरामध्ये लावली. जमीन मध्यम प्रतिची असून ठिबकने पाणी देतो. झेंडू लावल्यानंतर मधल्या सरीत उसाची लागवड करायची होती, मात्र यावर्षी पाऊस फारच कमी झाल्याने उजनी धरणात पुरेसे पाणी नाही. त्यामुळे ऊस लागवड करता आली नाही. झेंडूला नेहमीप्रमाणे रासायनिक खते देऊन किटकनाशके बुरशीनाशके फवारत असे. मात्र १ महिन्याचे पीक असताना पाने करपू लागली. रस शोषणारे किडे वाढले. त्याने पाने आकसून झाडे निस्तेज होऊन सुकू लागली. यासाठी कॅबराटॉफ, बाविस्टीन, कवच अशी औषधे नियमित अंतराने फवारली, मात्र रोग - कीड काही आटोक्यात येईना. प्लॉट सोडून देण्याची वेळ आली. अशी औषधे नियामीन अंतराने फवारली, मात्र रोग - कीड काही आटोक्यात येईना. प्लॉट सोडून देण्याची वेळ आली. अशी वेळ गेली १२ - १५ वर्षात कधी आली नव्हती. मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा थोडा अनुभव होता. म्हणून बारामतीला ११ सप्टेंबर २०१५ रोजी कृषी प्रदर्शन पाहण्यास गेलो तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा पहिलाच स्टॉल दिसला. प्रदर्शन पाहण्यास जाताना अशी रोगट २ - ३ रोपे सोबत घेऊन गेलो होती. ती प्रदर्शनात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सोलापूर प्रतिनिधी श्री. नागेश पाटील (मो. ९६८९५०९९७६) यांना दाखविली. त्यांनी सांगितले, "करपा, कीड यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने हा प्लॉट सुधारेल. तेव्हा तुम्ही प्लॉट काढू नका." या रोगामुळे १६५०० रोपांपैकी फक्त ८ ते ९ हजार रोपे शिल्लक राहिली होती. मग या ८ - ९ हजार रोगट रोपांसाठी प्रदर्शनातून सप्तामृत, हार्मोनी ही औषधे नेली. त्याची पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फवारणी केली असता ३ ऱ्या दिवशी पाने टवटवी त होऊ लागली.

उजनीचा माझा मित्र श्री. बाळू मेटे हे देखील झेंडू नेहमी लावतात. त्यांना सुद्धा रोग आटोक्यात न आल्याने २ - ३ लाखाचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी मला सांगितले होते, प्लॉट काही सुधारणार नाही तेव्हा अजून खर्च करू नकोस, प्लॉट सोडून देण्याशिवाय पर्याय नाही. मात्र शेवटचा पर्याय म्हणून मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरली. तिसऱ्या दिवशी फरक जाणवल्यावर पुढेदेखील नियमित फवारण्या घेतल्या. तर अक्षरश: गेलेल्या प्लॉटमधील ८ हजार रोपांपासून दसऱ्याला २ टन फुले मिळाली. ती ८० ते १२० रू./किलो दराने विकली. नंतर दिवाळीत ३ तोडे केले तेव्हा पहिल्या तोड्याला १०० रू. भाव मिळाला. नंतरचा माल ९० रू. ने व तिसऱ्या तोड्याच्या मालास ७० - ८० रू. किलो भाव मिळाला. दसरा दिवाळीच्य मध्ये एकदा ६० क्रेट फुले (६०० ते ७०० किलो) काढली होती. ती २५ ते ३० रू. ने गेली. असा एकूण ८००० रोपांपासून ६ टन माल निघाला.

दरवर्षी एका रोपापासून २ किलो फुले मिळतात. मात्र यंदा जुनचा पाऊस नाही. नंतर मधेच अचानक पडला की रोगराई वाढली. त्यामुळे खर्चही निघाला नसता. म्हणजे रोपांचा ५०,००० रू. आणि इतर खर्च ५०,००० रू. असे १ लाख रू. चे नुसकासन झाले असते.

तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १ लाख रू. खर्च निघून १।। लाख रू. नफा मिळाला. आता आले पिकासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. जर्मिनेटरचे आल्याला ड्रेंचिंग केले असता. पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून वर फुट निघाली. तेव्हा आले पोसण्यासाठी पुढील फवारण्या करीत आहे.