डाळींब पिकामध्ये नवीन असूनही ४८१ झाडांवरील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा खर्च २२ हजार, उत्पादन १३ टन, ७३ रु./किलो दर, उत्पन्न ९।। लाख

श्री अनिल श्रीरंग घाडगे,
मु.पो. ललगुन, ता. खटाव, जि. सातारा.
मो. ९८५०७२०९५७



मी जानेवारी २०१६ पासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर टोमॅटो, वांगी, कांदा या पिकावर केला आहे. पुसेगाव प्रदर्शनामधून (७ जानेवारी २०१६) डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे घेवून वापरली आहेत.

वरील पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांचा वापर केल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही पिके तग धरून जोमाने वाढली व उत्पादनात वाढ झाली. त्यामुळे माझ्याकडे ऑगस्ट २०१३ मध्ये ६५ गुंठे क्षेत्रामध्ये मध्यम ते हलक्या प्रकारच्या जमिनीत १२' x १०' अनंतराव लागवड केलेल्या भगवा डाळींबासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्याचे ठरवले व त्यानुसार नंतर दुसऱ्या दिवशी प्रदर्शनामध्ये जाऊन कंपनी प्रतिनिधी श्री. रविंद्र सुरळकर यांच्या सल्ल्यानुसार डाळींब पिकास सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या ५ फवारणीची संपुर्ण सप्तामृत औषधे घेऊन गेलो व त्याचा वापर केला.

बागेला डिसेंबरमध्ये ताण दिला होता. मग जानेवारीमध्ये बागेची छाटणी करून ४८१ झाडांना ६ ट्रॉली शेणखत देऊन ११ जानेवारी २०१६ ला पहिले पाणी सोडले. त्यानंतर दुसरे पाणी देताना जर्मिनेटर १ लि. आणि प्रिझम १ लि. ची आळवणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रिझम १ लि. + जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर २५० मिली ची २०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे बागेला जोमाने फुट निघण्यास चांगली मदत झाली. त्यानंतर २० दिवसन्नी दुसरी फवारणी प्रिझम १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे केली आणि त्यानंतर १५ दिवसांनी तिसरी फवारणी कळी निघतेवेळी थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + न्युट्राटोन ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर २५० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. या २ फवारण्यांमुळे बहार चांगला फुटला. कळी सेटिंग होण्यास मदत झाली.

त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित फवारणीमुळे झाडांवर जांभळाच्या फुलांप्रमाणे कळ्या लगडल्या होत्या. एप्रिल व मे मध्ये कळीचे रूपांतर गाठीत होत असताना बऱ्याच कळ्या काढून टाकल्या. तरीही मे महिन्यामध्ये धरलेल्या (लागलेल्या) फळांची संख्या प्रत्येक झाडावर १२५ - १५० होती. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या सल्ल्यानुसार प्रत्येक झाडावरील अशक्त व लहान २० - ३० फळे काढून टाकली. शेवटच्या टप्प्यातील फवारणीमुळे मालावर शाईनिंग, कलर, साईज यामध्ये बराच फरक जाणवला. प्रत्येक फळाचे वजन १८० ते ३०० ग्रॅम पर्यंत होते. हे फक्त डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले. डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरल्यामुळे व इतर गरजेनुसार घेतलेल्या फवारण्यांमुळे बहार चांगल्याप्रकारे यशस्वी झाला. एकूण १।। लाख रु. खर्च झाला. यामधील शेणखतावर २२,००० रु . आणि ते झाडांना देण्यासाठीची मजुरी ३००० रु., छाटणी बहार धरण्यापुर्वीची १ व बहार धरतानाची १ अशा २ छाटण्यांचा २५,००० रु., डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांवरील २२,००० रु., इतर बाहेरील औषधे व विद्राव्य खते यांचा ४५ हजार रु., आधारासाठीच्या काठ्या व इतर मजुरी याचा ३५,००० रु. असा एकूण १।। लाख रु. खर्च झाला आणि ४८१ झाडांपासून १२ टन ६०० किलो माल व्यापाऱ्यांनी जागेवरून ७३ रु./किलो भावाने नेला. ४ ऑगस्टला तोडा चालू झाला. ४०० - ५०० किलो माल लोकल मार्केटला विकला. असे एकूण ९।। लाख रु. उत्पन्न मिळाले. डाळींब पिकामध्ये मी नवीन असताना केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे यशस्वी झालो एवढेच सांगू इच्छितो.