कोरडवाहू कपाशीचा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने उतारा समाधानकारक

श्री. मिलींद नवसागर वाठोरे, मु.पो. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२०६.


मी गेल्यावर्षी कापूस पिकावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर केला, मात्र क्षेत्र हे कोरडवाहू असल्यामुळे मला पुर्णपणे वापर करायला जमले नाही. कारण गेल्यावर्षी आमच्याकडे दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याअभावी उत्पादनाची खात्री नव्हती. यावर्षी मात्र डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर लागवडीनंतर आजपर्यंत करत आहे. गडबडीमध्ये पेरणीच्या वेळी मात्र जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करणे जमले नाही. उगवाणीनंतर जर्मिनेटर ५० मिली + प्रिझम ५० मिली + १९:१९:१९ हे ६० ग्रॅम १५ लि. पाण्यात घेऊन ड्रेंचिंग (आळवणी) केली असता पांढऱ्या मुळीचा जारवा वाढल्याने मर झाली नाही. झाडांची वाढ झपाट्याने होऊन झाडे हिरवीगार झाली. नंतर १५ दिवसांनी एकरी कल्पतरू खताची २ पोती आणि डी.ए.पी. १ बॅग दिली असता जमीन भुसभुशीत होऊन झाडांची वाढ चांगली झाली. ३० दिवसांनी जर्मिनेटर ५०० मिली + कॉटन थ्राईवर ५०० मिली + क्रॉपशाईनर ५०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली असता मावा, तुडतुडे यांच्यावर नियंत्रण मिळाले. शिवाय झाडाची वाढ उभट न होता शाखीय वाढ होत गेली. त्यामुळे फांद्यांची संख्या वाढत गेली. तसेच ५० दिवसांनी आणि ७० दिवसांनी अशा पुन्हा २ फवारण्या केल्या असता आता कापसाची जवळपास ५।। फुट उंची झाली असून ४० - ५० बोंड पक्व झाली आहेत. त्यामुळे यावर्षी मला कोरडवाहू ५ एकरातून ४० क्विंटल कापसाची अपेक्षा आहे. तसेच तूर या पिकासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणार आहे.