५ गुंठे मिरचीपासून ९२ हजार नफा

श्री. विनोद बापूराव वानखेडे,
मु.पो. उटी, ता. महागाव, ज. यवतमाळ - ४४५२०५.
मो. ९९२२३९३८४०


५ गुंठ्यामध्ये आम्ही १२ जून २०१५ रोजी ४' x २' अंतरावर मिरची लागवड केली. बिजो -३७८ हे वाण आम्ही लावले. आम्हाला फारशी माहिती नव्हती. तरी आम्ही आमचे मेव्हणे श्री. दिपक राजाभाऊ कदम रा. वायपणी (मो. ९४२३७२७२९१) यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांबद्दल माहिती दिली व ती आम्हाला वापरण्यास सांगितले. कदम यांनी आम्हाला तुळजाई कृषी केंद्र सारखाणी येथून औषधे घेऊन दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला जर्मिनेटरची बिजप्रक्रिया केली व कल्पतरू २५ किलो दिले. आमच्याकडे तुषार सिंचन पद्धत होती. सुरुवातीला मिरची लावून १० ते १२ दिवसांनी आम्ही पहिली ड्रेंचिंग जर्मिनेटर ५० मिली आणि २५ ग्रॅम एम - ४५ ची केली. त्याने मिरची हिरवीगार झाली. मर, मुळकुज लागली नाही. तेथून १५ ते २० दिवसांनी सप्तामृत फवारले. त्यामुळे आमची मिरची रोगमुक्त होऊन झाडे हिरवीगार झाली. मग थोडे रासायनिक खत दिले. आमच्यकडे मिरची थोडी रासायनिक खत दिले. आमच्याकडे मिरची थोडी असल्यामुळे आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट-पी, प्रिझम, न्युट्राटोन, हार्मोनी, स्प्लेंडर हे प्रत्येकी १ - १ लिटर) एकदाच आणली व त्यामुळे आमचे सारखे जाणे येणे करण्याचा वेळ व खर्च वाचला.

मिरची लावून जवळपास ३० - ३५ दिवस झाले होते. मग आम्ही पुन्हा कल्पतरू २५ किलो दिले व त्यामुळे मिरची अधिक हिरवीगार होऊन रोगमुक्त राहिली. नंतर पीक ४० ते ४२ दिवसाचे असताना कुठे कुठे एक - एक फुल दिसत होते. तेव्हा आम्ही दुसरी फवारणी सप्तामृताची केली. त्यामुळे मिरचीवर किडीपासून पुर्ण पणे नियंत्रण मिळाले. म्हणजे रोग - कीड आलाच नाही व झाडाला चांगल्याप्रकारे फुले येण्यास सुरुवात झाली. पीक ६५ - ७० दिवसाचे असताना पहिली मिरची तोडणी सुरू झाली. पहिली तोडणी करून आम्ही तिसरी सप्तामृत फवारणी केली. ही फवारणी थोडी उशीरा झाली. आम्हाला तिसरी फवारणी ही तोडणी आधी करायची होती. पण ती फवारणी मिरची तोडणी चालू झाल्यावर केली गेली. तरी या फवारण्यांमुळे तोड्याला २४ ते २५ कट्टे मिरची निघत होती. प्रत्येक कट्टा सरासरी ३० ते ३२ किलोचा असायचा. आमची मिरची पाहून गावातील प्रत्येक शेतकरी व शेजारच्या गावातील शेतकरी आम्हाला विचारायचे. आमच्या मिरचीचा प्लॉट पाहण्यासाठी दाररोज २०-२५ शेतकरी येत असत व आम्हाला विचारत की तुम्ही या मिरचीला काय वापरले. तेव्हा आम्ही त्यांना आवर्जुन सांगायचो की आमचे मेव्हणे दिपक कदम यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत व सप्तामृत वापरतो.

आम्हाला जवळपास ५ गुंठ्यामध्ये कमी भाव असताना सुद्धा १ लाख १६ हजार रुपयाची मिरची झाली. आम्हाला निव्वळ नफा ५ गुंठ्यामध्ये ९२,००० रु. झाला. आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची पुर्ण औषधे व कल्पतरू सेंद्रिय खत वापरून खुप समाधानी आहोत व येथून पुढेही आम्ही ठरवले की प्रत्येक पिकाला याचा वापर करायचा व इतरांना पण हे तंत्रज्ञान वापरण्यास सांगतो.