हिवरी मिरची परवडत नाही म्हणून लाल मिरची करण्यासाठी राईपनरचा उत्तम उपयोग

श्री. मारोतराव गंगाराम काळे,
मु.पो. दहिफळ, ता.जि. जालना - ४३१२०५


मी २० गुंठे मध्यम प्रतिच्या जमिनीत मिरची या पिकाची ३' x २' वर १५ जुलै २०१६ रोजी लागवड केली असून मिरची चांगली जोरात आली आहे. अनुकूल वातावरणामुळे या पिकावर चालू वर्षी रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी आहे. परिणामी उत्पन्न चांगले येत असल्यामुळे बाजारभाव कमी आहे. म्हणून हिरवी मिरची विकणे परवडत नाही. त्याकरिता मी मिरची झाडालाच लाल (पक्व) करून वाळवून विकण्याचे ठरविले आहे. परंतु या गोष्टी करीता थोडा जास्त कालावधी लागत होता. तेव्हा मिरची पिकण्यासाठी तंत्रज्ञानाच्या शोघात होतो. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या प्रतिनिधीने राईपनरचा डेमो देऊन मिरची लवकर लाल पक्व तयार करून दाखवली. त्यानुसार मी आता प्रत्येक तोड्याच्या वेळेस आधी राईपनर फवारतो व नंतर मिरचीला लाल कलर आल्यावर तोडतो. राईपनर हे एक औषध नैसर्गिक रंग व फळ पोसण्याकरीता चांगले आहे याची मला खात्री झाली आहे. त्यामुळे पुढील पिकांना पुर्ण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरण्याचा निर्धार आहे.