डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे उसाचा एकरी उतारा ९० टन खोडवाही चांगला

श्री. तेजस राधाकिसन सुपेकर,
मु.पो. संगमनेर खु., ता. संगमनेर, जि. अहमदनगर.
मो. ९५६१६२८५७०


मी डॉ.बावसकर तंत्रज्ञान उसावर वापरण्याचे ठरविले. कारखान्यातून उसाचे बेणे आणून १०० लि. पाण्यामध्ये १ लि. जर्मिनेटर घेवून त्यात बेणे अर्धा तास बुडवून त्याची लागवड जुलै २०१४ मध्ये केली. सरीचे अंतर ३।। फुट घेवून मध्ये ४ बोटाचे अंतर ठेवून बेण्याची लागवड केली. जर्मिनेटरमुळे एकसारखे फुटवे निघाले. त्यानंतर उसाला जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉपशाईनर + प्रिझम + न्युट्राटोन प्रत्येकी ५० मिली/पंप याप्रमाणे घेवून फवारणी केली. त्यामुळे उसाची चांगली वाढ झाली. खतांमध्ये कोंबडखत आणि युरीया २ बॅग, सुपर फॉस्फेट १ बॅग, कल्परू खत ४ बॅग अशी खते वापरली आणि वेळोवेळी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या एकूण ३ फवारण्या केल्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या उसापेक्षा माझा ऊस चांगला आला.

हा ऊस डिसेंबर २०१५ मध्ये तोडला. तर एकरी ९० टन उतारा मिळाला. त्याला २१०० रु./टन भाव मिळाला. त्यानंतर त्या उसाचा खोडवा घेतला आहे. खोडव्याला देखील सुरुवातीला जर्मिनेटर पाण्यातून सोडले असून बांधणीच्या वेळी कल्पतरू खताच्या ४ बॅगा व सुपर फॉस्फेट १ बॅग दिले आहे.

सध्या हा १० महिन्याचा खोडवा १८ ते २२ कांड्यावर आहे.