टोमॅटो बागायतदारांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे टोमॅटो पुस्तक लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जसे आम्ही शेवग्यावर काम केले आहे. तसे १९५७ साली टोमॅटो व गावठी गुलाबावर काम केले. महाराष्ट्रातील नाशिक, संगमनेर, पिंपळगाव (ब.), नारायणगाव भागात १९७० सालापासून टोमॅटोची लागवड सुरू झाली. पुण्यातील सदाशिव पेठेत अत्यंत उच्चभ्रु लोकांत १९६० सालापासून सणासुदीला, पाहुणेरावळे आल्यावर किंवा लग्नसराईत प्रचलित होता. खरेतर कोशिंबीरीचा उगम पेशवाईत झाला आहे. म्हणजे त्या काळात पुण्यातील चोखंदळ लोक हे चवीच्या बाबतीत फार चिकित्सक असत. म्हणून महाराष्ट्रात प्रथम टोमॅटोची चाहूल पुण्यामध्ये लागली असावी.

टोमॅटोचे आरोग्यदृष्ट्या महत्व इतके आहे की, जयाप्रमाणे शेवगा हा ३०० प्रकारच्या रोगावर प्रतिबंधात्मक (Prophylactic) व उपचारात्मक (Curative) वापरता येतो, त्याचप्रमाणे अनेक छोटे मोठे आणि दुर्धर रोग कॅन्सर, हार्टअटॅक, मेंदुचे विकार, रक्ताचे, डोळ्याचे विकार असे अनेक प्रकारचे रोग यावर अतिशय उपयुक्त आहे असे प्रयोगातून अनुभवातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे लहानापासून ते तरूण मुले - मुली, कौटुंबिक माणसे व जे वारधक्याकडे झुकले आहेत अशा साऱ्या मानवतेचा टोमॅटो हा आरोग्याचा बहुगुणी दागिना आहे.

महाराष्ट्रातील अब्जावधी रुपयाचा टोमॅटो हा बांगलादेश, पाकिस्तान व मालदिव या सार्क राष्ट्रात सतत बाराही महिने निर्यात होतो. हे पीक फक्त ३- ४ महिन्याचे असते व हे कोणत्याही मोसमात डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने यशस्वीरित्या येते तसेच खोडवाही घेता येतो हे हजारो शेतकऱ्यांच्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. याचे अनेक उपांग जसे जमीन, हवामान, बियांची उगवण, लागवड, हंगाम, आच्छादन, खते, पाणी, रोग, किडी, आंतर मशागत, प्रक्रिया उधोग अशा अनेक अंगांनी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने सखोल अभ्यास करून मार्गदर्शन करण्याची परंपरा गेल्या ३० - ३५ वर्षापासून सतत चालू आहे. या प्रयोगातून आलेल्या निष्कर्ष या पुस्तकात दिले आहेत. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना, टोमॅटोच्या शेतकऱ्यांची भगवतगिता म्हणून ह्या पुस्तकाकडे पाहता येईल. याची किंमत १५०/- रु. असून ४० रु. कुरीयर/रजिस्टर पोस्ट चार्जेस पाठवून आपणास मागविता येईल.