अवर्षणप्रवण अमळनेर तालुक्यात कापसाचे भरघोस पीक

श्री. अरविंद प्रल्हाद कुलकर्णी, मु.पो. सावखेडा, ता. अमळनेर, जि. जळगाव-४२५१२२.
मो. ९४२३९८०४२४


मला सन १९८४ पासून २०१६ पर्यंत साधारण ३२ वर्षाच्या औधोगीक वसाहतीत गरवारे आणि सझलान पॉवर वींड सारख्या गृपमध्ये व्यवस्थापक पदावर कामाचा अनुभव असताना प्रत्येक प्रॉडक्ट हे क्वालिटी प्रॉडक्टच स्विकारण्याची सवय तसेच सेवा निवृत्तीनंतर उद्योग असावा म्हणून स्वतःच्या धारण क्षेत्रावर लक्ष केंद्रिय केले आणि शेती प्रदर्शनात पुणे येथे २०१५ मध्ये गेलो असता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी प्रकाशीत 'कृषी विज्ञान' मासिकाची वर्गणी भरून त्याचे नियमित वाचन करण्यास सुरुवात केली. वर्षभरातील वाचनातून भरपूर प्रेरणादाई अनुभवसिद्ध माहिती मिळाली.

डॉ. स्वामिनाथन, डॉ. माशेलकर, डॉ. विजय भटकर यांच्यासारख्या प्रज्ञावंतांनी गौरविलेल्या डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा आणि त्यांच्या हस्ते विविध पुस्तकांचे प्रकाशन यामुळे प्रभावीत झालो. स्वतः अमेरिकेत जाऊन कृषी पदवीधर शेतकऱ्याला त्याच्या शेतावर सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करणाऱ्या अनुभवी शाश्त्रज्ञ डॉ.बावसकर यांनी निर्माण केलेले प्रॉडक्ट कोणताही विचार न करता विकत घेतले आणि जून २०१७ पासून वापरण्यास सुरुवात केली.

शेती क्षेत्रात मी नवीनच असल्याने डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी जळगाव विभागाचे प्रतिनिधी श्री. मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत, जर्मिनेटर, कॉटन थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन, हार्मोनी यांचा पीक घेतले आहे. कापसाची लागवड २९ जून २०१७ ला केली आणि २४ जुलै रोजी ५ एकरला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे कल्पतरु खत ७ बॅगा दिले. नंतर ३५ दिवसांनी ३ ऑगस्टला जर्मिनेटर ६० मिली + कॉटन थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली + प्रिझम ५० मिली + १५ लि. पाणी याप्रमाणे पहिली फवारणी केली. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी जर्मिनेटर ६० मिली + १९:१९:१९ (आर.सी.एफ.) चे पंपाद्वारे आळवणी केले आणि २० ऑगस्टला १०:२६:२६ खत दिले. त्यानंतर पीक ५५ दिवसाचे असताना २३ ऑगस्ट २०१७ रोजी कॉटन थ्राईवर ६० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + प्रिझम ६० मिली + लान्सर गोल्ड २५ मिली + मोनोक्रोटोफॉस २५ मिली प्रती पंपास घेऊन तिसरी फवारणी केली. त्यानंतर ८५ दिवसांचा कापूस झल्यावर २० सप्टेंबर २०१७ ला कॉटन थ्राईवर ६० मिली + प्रिझम ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली + १५ लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यानंतर पावसाळा कमी असल्यामुळे प्रयोगादाखल पुन्हा ३० ऑक्टोबर २०१७ रोजी कॉटन थ्राईवर ७० मिली + न्युट्राटोन ५० मिली + हार्मोनी ३० मिली प्रती पंपास घेऊन फवारणी केली. तर अमळनेर तालुका आवर्षण ग्रस्त असून देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे आमच्या कापसाचे उत्पादन सरासरीपेक्षा नक्कीच वरचढ आहे. परिसरातील बरेच शेतकरी आमचा कापूस पाहण्यासाठी आवर्जुन येत आहेत.

या अनुभवातून यापुढेही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी उत्पादने वापरून रासायनिक खतांचा वापर शुन्य करणार आहे. हे तंत्रज्ञान आमच्यासारख्या नवीन शेती व्यवसाय करणाऱ्यांना नक्कीच फयदेशीर व योग्य मार्गदर्शक ठरले आहे, यात शंका नाही.