केळीची उन्हाळी लागवड ६ हजार खोड, घडांची रास ३५ किलो, १५ लाख, खोडवाही तितकाच जबरदस्त

श्री. सुनील भागवत पाटील,
मु. जांभुळ, पो. वाकोद, ता. जामनेर, जि. जळगाव.
मो. ९९२१२६२६९२


माझी जांभुळ शिवारात ५० एकर शेती आहे. त्यामध्ये केळी, कापूस, सोयाबीन, मका ही पिके घेतो. त्यामध्ये २८ एप्रिल २०१६ ला मी ४ एकर हलक्या मुरमाड जमिनीत ५ x ५ ।। फुटावर ६००० केळी रोपांची (जैनच्या) लागवड केली. त्यावेळी मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी जर्मिनेटर या औषधाची फवारणी तसेच ८ - ७ दिवसांनी जर्मिनेटरची ३ वेळा ड्रेंचिंग केली असता रोपे तयार झाली व जोमदार वाढू लागली. सप्तामृत औषधांची फवारणी २० दिवसांनी सुरू केली. अशा ४ फवारण्या केल्या. त्यामुळे झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढून झाडाची वाढ लवकर व चांगली झाली. पाने हिरवीगार, लांब मिळाली. दर महिन्याला १००० झाडांना १ लि. जर्मिनेटर व साफ पावडर ५०० मिली ची ड्रेंचिंग जून महिन्यापर्यंत चालू ठेवली. त्यामुळे उन्हापासून बागेचं चांगल्या प्रकारे संरक्षण झाले. पांढऱ्या मुळांची वाढ होऊन झाडे जोमाने वाढू लागली.

जुनमध्ये पाऊस झल्यानंतर ६००० केळीला युरीया ४ बॅगा १०:२६:२६ च्या १८ बॅगा, कल्पतरू १२ बॅगा दिल्या. यामुळे केळीची जोमाने वाढ होऊन निसवण लवकर व चांगल्याप्रकारे झाली. त्यानंतर घडांवर दर १५ दिवसांनी राईपनर ६० मिली + न्युट्राटोन ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली प्रति पंप घेऊन २ वेळा फवारणी केली. त्यामुळे केळीची लांबी आकार, वजन वाढून चमक आली. त्यामुळे मला सर्व क्षेत्रापासून जवळपास ३६ किलोची रस मिळाली. त्यावेळी १००० रु. भाव असल्याने मला त्या बागेचे १५,००,००० रु. झाले.

त्याच आधारावर मी यावर्षी पिल बाग ठेवला, सुरूवातीपासून जर्मिनेटरची ड्रेंचिंग व सप्तामृत फवारण्या चालू आहेत. तसेच कल्पतरू ६००० झाडांना १२ बॅगा व नंतर कमळ निघतेवेळी पुन्हा १२ बॅगा असा डोस दिला आणि गेल्यावर्षी प्रमाणे सप्तामृताच्या फवारण्या केल्या. आतापर्यंत ७०% निसवण झाली आहे. निसवणीनंतर गेल्यावर्षीप्रमाणे राईपनर, न्युट्राटोनच्या घडांवर २ - ३ फवारण्या करणार आहे. तरी मला यावर्षी ४० किलोची रास अपेक्षीत आहे.

आता यापुढेही मी हे तंत्रज्ञान चालू ठेवणार आहे. माझे प्लॉट पाहण्यासाठी आमच्या भागातील श्री. प्रल्हाद देशमुख (पहूर) तसेच दिलीप देशमुख (पहूर) डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी कंपनी प्रतिनिधी श्री. रविंद्र चौधरी (मो. ७०३८२३१९४५) आमच्या शेतावर येऊन वेळोवेळी मार्गदर्शन देत असतात, तसेच त्यांच्या मार्गदर्शनातून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी औषधे वापरल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन मिळते. हा माझा अनुभव आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी सर्व पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरावी व भरघोस उत्पादन घ्यावे असे मला वाटते.