निर्यातक्षम द्राक्षाचे एकरी १२० क्विंटल उत्पादन, भाव २००० रू. क्विंटल

श्री. प्रविण सदाशिव जाधव, मु. पो. मोहाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक. मोबा.९८६८१७२३२७

मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा द्राक्ष बागेसाठी ३ वर्षापासून वापर करीत आहे. माझ्याकडे ८ वर्षापुर्वीची थॉमसन जातीची ४ एकर द्राक्षबाग असून मागील वर्षी २४ ऑक्टोबर २००७ रोजी छाटणी केली. हायड्रोजन सायनामाईडच्या २८ लि. पेस्ट बरोबर जर्मिनेटर १ लि. चा वापर केला. एकंदरीत पुढील तीन डोळ्यांना पेस्ट लावावी. घड आकाराने मोठे व एकसारखे निघाले. पोंगा अवस्थेत जर्मिनेटर १ लि. थ्राईवर १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली. घडांची साईज वाढली. घड जिरले नाही, पोषण चांगले झाले. पहिली डिपींग झाल्यानंतर दोन दिवसानंतर जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात दुसरी फवारणी केली. घडाला लांबी, साईड पाकळ्या मोठ्या प्रमाणत मिळाल्या. पाने रुंद होऊन गर्द हिरवागारपणा आला.

तिसरी फवारणी ८० % फुलोरा पास झाल्यानंतर थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात केली. एकंदरीत तीन फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या केल्या. मण्यांचे सेटिंग व्यवस्थित झाले.

मणीकूज, घडकूज, मणीगळ झाली नाही. वरील फवारणीमुळे डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू रोगांवर पानामध्ये प्रतिकारक्षमता वाढली. बुरशीनाशकाच्या फवारण्या कमी झाल्या. किटकनाशकांच्या फवारण्य थोड्या केल्या. रासायनिक खतांचा संतुलित वापर केला. ५० ते ६० घड होते. सर्वच घड व्यवस्थित पोसले. मण्यांची साईज १८ ते २० एम. एम. झाली. निर्यातीसाठी सर्व घड निघू शकले असले. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चिलीच्या द्राक्षांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली. त्यामुळे निर्यातीचे दर कमी झाले. आमच्या बागेतील सर्व घडांची साईज निर्यायोग्य असूनसुद्धा माल निघाला. सर्व मालास २००० रू./ क्विंटल बाजार मिळाला. त्यामुळे एरवी निर्यातीला जो २५ ते ३० % च माल जातो व त्यास अधिक भाव मिळतो. तेच लोकल मार्केटमध्ये सर्व मालास २००० रू क्विंटल भाव मिळाल्याने निर्यातीइतकेच पैसे झाले.

Related Articles
more...