१८ वर्षाची जुनी बाग, २ एकर, १७ टन , १२ लाख रू

वनरूट वरील द्राक्ष बाग

श्री. शिवाजी दोधा देसले, मु. पो. गोराणे , ता. सटाणा, जि. नाशिक.
मोबा. ९७६७५७५७८४


क्षेत्र - १ एकर, छाटणी तारीख - १८ सप्टेंबर २०१०

द्राक्ष जात थॉमसन १८ वर्षाचे झाड असताना अलींमध्ये दोन एकरात १७ तन द्राक्ष काढली. भाव ७१ रू. किलो मिळाला. सुरवातीला पेस्टमध्ये जर्मिनेटर वापरले. काडीचा सबकेन डोळा सारखा फुटला. तेथून चांगली सुरवात असताना माल भरपूर निघाला. घडासंख्या सुद्धा कमी केली. काडीवर दोन घड ठेवले. नंतर वांझ फुट काढून थ्राईवर + क्रॉंपशाईनर फवारले असताना पान जाड होत गेले. त्यामुळे डाऊनी पहावयास मिळाला नाही व नंतर प्रत्येक स्प्रेमध्ये थ्राईवर व क्रॉंपशाईनर वापरत गेल्यामुळे भुरी सुद्धा पहावयास मिळाली नाही. नंतर १५ दिवसांचा घड असताना पोपटी रंग होण्यासाठी न्युट्राटोन फवारले. पाऊस चालू असतानासुद्धा एकही घड जिरला नाही.