आपत्कालीन परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बागा वाचवून दर्जेदार उत्पादन
गारपिटीनंतर द्राक्ष घडांचे संरक्षण


मार्चच्या (२००९) दुसऱ्या पंधरावड्यात नाशिकच्या पश्चिम - उत्तर भागात वादळी पाऊस व गारा पडल्या, त्यामुळे काढणीस असलेल्या बऱ्याचा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

द्राक्षांच्या घडांवर कागद अथवा बागेवर शेडनेट ज्या बागायतदारांनी लावले होते अशा बागेतील द्राक्षे गारांपासून बऱ्याच प्रमाणात संरक्षित राहिल्या असतील. मात्र तरीही बागेतील घडांवर गारांचा मार लागलेले मणी सहज दिसून येतील, असे मणी काढून टाकावेत.

बागेमध्ये पावसाच्या पाण्यामुळे किंवा पावसामुळे वाढलेल्या सापेक्ष आर्द्रतेमुळे घडावर बुरशीजन्य रोग व फळकूज वाढू शकते. घडावरील अशाप्रकारचे रोग नियंत्रित ठेवण्यासाठी आता बुरशीनाशकाची फवारणी करणे रेसिड्युच्या दृष्टिकोनातून धोक्याचे व खर्चिक आहे. सध्याच्या परिस्थितीत जैविक नियंत्रणाचा फायदा घेता येईल. यासाठी ट्रायकोरडर्मा पाच मी. लि. प्रति लिटर स्वतंत्रपणे किंवा बॅसिलस सबटिलीस किंवा सुडोमोनास फ्युलरोसन्स यासारख्या जिवाणूंच्या फॉर्म्युलेशसोबत घडांवर फवारावे. या फवारणीचा उपयोग घडांवर फळकूज करणारी बुरशी आणि जीवाणूंची वाढ थांबविण्यासाठी होईल.

सुरूवातीपासूनच प्रतिबंधात्मक व नुकसान कमी व्हावे म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर हा अनेक द्राक्ष बागायतदारांना आशादायक ठरून नुकसान कमी झाल्याचे आम्हांस कळवले आहे.

ज्या ठिकाणी घडांवर जखमा दिसतील अशा घडांवर थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ६० ते ७० मिली + न्युट्राटोन ३० मिली / १० लि. पाण्यातून २ -३ वेळा ४ -४ दिवसांनी फवारल्यास जखमा भरून निघतात. पोषण चांगले होते. ज्या ठिकाणी फळकूज दिसेल अशा ठिकाणी त्वरित कुजलेला भाग बागेबाहेर काढून टाकणे महत्त्वाचे आहे. कारण कुजलेल्या घडांमध्ये माश्यांसारखे कीटक वाढतात. या कीटकांच्या नियंत्रणसाठी किटकनाशकाची फवारणी गरजेची नाही. कुजलेले द्राक्ष घड बागेबाहेर काढल्यास किटक वाढणार नाहीत.

घडांवर बुरशी अथवा जीवाणू वाढत आहेत असे आढळून आल्यास प्रोटेक्टंट १ ग्रॅम + हुवासन (हायड्रोजन पॅराऑक्साईड अधिक कोलायडल सिल्हर) सारख्या औषधाची अर्धा मिली प्रति लिटर प्रमाणात घडांवर फवारणी करावी हुवासान हे औषध हॉटेलमध्ये कापलेले सॅलड धुण्यासाठी वापरले जाते, म्हणून त्याचा वापर करणे धोक्याचे नाही.

काढणीआधी काही दिवस घडांवरती ८० डब्ल्यूडीजी सल्फर एक ते दीड ग्रॅम प्रमाणात घडांवर डाग येणार नाहीत अशाप्रकारे फवारावे. सल्फरच्या फवारणीने घडावरील भुरी नियंत्रित होईलच,त्याचबरोबर काढणीनंतरची कूज गंधकामुळे कमी होईल. गंधकाची एमआरएल ५० पीपीएम असल्याने उशीरा केलेल्या गंधकाच्या फवारणीपासून धोका नाही.

ज्या बागेमध्ये काढणीसाठी आठ ते दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस असतील अशा बागेमध्ये अॅझोक्सिस्ट्रोबीन २५ ईसी, ०.५ मिली प्रति लिटर फवारण्यास हरकत नाही. या फवारणीने बागेतील भुरी व जखमातून होणाऱ्या बुरशींची लागण थांबविण्यास उपयोग होईल. सात ते आठ दिवसांमध्ये या बुरशीनाशकाची रेसिडयू एमआरएल २ पीपीएम पेक्षा कमी होते. हे औषध महागडे असले तरीही गरजेप्रमाणे त्याचा वापर करावा व रेसिड्यूचा धोका असलेल्या इतर कुठल्याही बुरशीनाशकाचा वापर करू नये.

बाजारात उपलब्ध असलेल्या जैविक किंवा वनस्पतीजन्य बऱ्याच औषधांमध्ये किटकनाशकांचे मिश्रण आढळले आहे. अशा औषधांचा उपयोग शक्यतो टाळावा. विशेषता: पावसानंतर लाल कोळी किंवा पिठ्या ढेकूण कमी होतात.