फयान वादळातही द्राक्षबागेचे एकरी १६ टन उत्पादन, दर २६ रू किलो

श्री. विजय जाधव, मु. मुखेड, पो. पिंपळगाव ( ब.), ता. निफाड, जि. नाशिक.
मोबा. ९९६०८९८००८


गत वर्षी आमच्या परिसरातील द्राक्ष बागांना माल कमी निघणे, घड जिरणे या समस्यांना तोंड द्यावे लागले.

मी मागील ५ ते ६ वर्षापासून डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करीत आलेलो आहे. ऑक्टोबर छाटणीनंतर पेस्ट केल्यानंतर माल दिसत नाही. म्हणून परत (डबल) कटींग करून बाग धरण्याची वेळ आमच्या भागात अनेक द्राक्ष बागायतदारांवर आली. मी ३० लि. पेस्टमध्ये १ लि. जर्मिनेटर चा वापर केला. छाटणी २२ ऑक्टोबर २००९ ला केली. थॉमसन -१ एकरासाठी पहिली फवारणी पोंगा अवस्थेत असताना थ्राईवर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + २०० लि. पाण्यातून केली. एका काडीवर ३ ते ४ घडांची संख्या दिसू लागली व धड अणकुचीदार, आकाराने मोठे निघाले, जिरले नाही की वाळीत रूपांतर झाले नाही. प्रत्येक काडीवर २ - २ घड ठेवले एका प्लॉटमध्ये मात्र डबल कट घेतला. त्यामध्ये देखील ३ ते ४ घड मिळाले.

थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि.+ राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमची २०० लि. पाण्यातून फ्लॉवरींग स्टेजमध्ये फवारणी केली.

अतिशय खराब हवामान असतानादेखील फुलोरा अवस्थेत गळ झाली नाही. सर्वत्र डाऊनी मिल्ड्यूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असताना डाऊनीचा प्रादुर्भाव कमी होता. सोबत बुरशीनाशक, किटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या होत्या. द्राक्षमणी बाजरी आकाराचे असताना थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि + न्युट्राटोन १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमची २०० लि.पाणी या प्रमाणात फवारणी केली.

वरील फवारणीनंतर द्राक्षमणी वाटण्याच्या आकाराचे असताना वरीलप्रमाणेच फवारणी केली असताना सनबर्न, शॉटबेरीज, वॉटरबेरीजपासून बचाव झाला. भूरी डाऊनी रोगांवर पानांमध्ये प्रतिकारशक्ती वाढली. पाने निरोगी व आकाराने मोठी मिळाली. शेंडा चांगला मिळाला. जर्मिनेटर ड्रिपमधून एकरी १ लि. दिले व फवारणीमधून १ लि. २०० लि. पाणी या प्रमाणात दिले.

द्राक्ष मण्यात पाणी उतरत असताना मण्यांची फुगवण अतिशय चांगली मिळाली. १६ ते १८ एम. एम. गोडी मिळाली. या अवस्थेत थ्राईवर १ लि.+ क्रॉंपशाईनर १ लि + राईपनर १ लि.+ न्युट्राटोन १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमची २०० लि.पाणी या प्रमाणात फवारणी केली.

वरील फवारणीनंतर द्राक्षमणी वाटाण्याच्या आकाराचे असताना वरीलप्रमाणेच फवारणी केली असतना सनबर्न शॉर्टबेरीज, वॉटरबेरीजपासून बचाव झाला. भूरी, डाऊनी रोगांवर पानांमध्ये प्रतिकारशक्ती वाढली. पाने निरोगी व आकाराने मोठी मिळाली. शेंडा चांगला मिळाला. जर्मिनेटर ड्रिपमधून एकरी १ लि. दिले व फवारणी मधून १ लि. २०० लि. पाणी या प्रमाणात दिले.

द्राक्ष मण्यात पाणी उतरत असताना मण्यांची फुगवण अतिशय चांगली मिळाली. १६ ते १८ एम. एम. गोडी मिळाली. या अवस्थेत थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि + राईपनर १ लि.+ न्युट्राटोन १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली.

डिपींगमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वापराने G.A. चा वापर कमी

डिपींगमधील वापर हा फक्त पहिल्या डिपींगमध्ये G.A. + जर्मिनेटर ५ मिली / लि. याप्रमाणे केली. डबल कटिंग केलेल्या बागेत देखील निर्यातक्षम उत्पादन मिळाले. एकरी १६ टन उत्पादन मिळाले. २६ रू. किलो दर मिळाला.

या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे प्रतिकूल परिस्थिती असताना फयान वादळ, डाऊनी मिल्ड्यूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतानासुद्धा द्राक्षबागेत समाधानकारक उत्पादन घेता आले. माझ्या भागातील इतर द्राक्ष बागायतदारांना वरील समस्यांमुळे नुकसान सोसावे लागले.