द्राक्ष - एप्रिल छाटणीकरिता फवारणीचे वेळापत्रक


ज्येष्ठ शेती शास्त्रज्ञ - प्रा. डों. वि. सु. बावसकर यांची सर्वश्रेष्ठ निर्मिती

जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट (पंचामृत), हार्मोनी व कल्पतरू सेंद्रिय खत वापरा

एप्रिल छाटणीनंतर - जुन्या, नव्या, कमकुवत व डॉंग्रीज बागेचे ओलांडे पुर्ण व लवकर फुटण्यासाठी, काड्या एकसारख्या सशक्त व भरपूर निघण्यासाठी - (छाटणीनंतर २ ते ३ दिवसांनी ओलांड्याच्या दोन्ही बाजूस चांगली फवारणी घेणे. ) जर्मिनेटर ५०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लिटर पाणी.

मोठ्या व सशक्त घडांच्या निर्मिती साठी, डोळे मोठे व कोचीदार होण्यासाठी, सबकेन फुटण्यासाठी, काडी सशक्त होऊन लवकर पिकण्याकरिता, पाने मोठी, रुंद व जाड होण्यासाठी - (वरील फवारणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी) थ्राईवर ३०० मिली + क्रॉंपशाईनर ३०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लिटर पाणी.

काडी पुर्ण पिकण्यासाठी, प्रतिकूल हवामानात ऑक्टोबर छाटणीपर्यंत पाने टिकण्यासाठी, द्राक्षवेलींची पाने, काड्या कार्यक्षम राहून खोडात राखीव अन्नसाठा तयार होण्यासाठी, द्राक्षवेळी सशक्त होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि डावणी, भुरी व करपा रोगाच्या प्रतिबंधासाठी - ( वरील फवारणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी) थ्राईवर ३०० मिली + क्रॉंपशाईनर ३०० मिली + राईपनर ३०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + हार्मोनी १५० मिली + १०० लिटर पाणी.

फायदे : * १०० % ओलांडे पुर्ण व लवकर फुटले जातात.

* काडी जोमदार व निरोगी वाढते

* प्रतिकुल हवामानात ऑक्टोबर छाटणीपर्यंत पाने टिकून राहतात.

* पाने, काड्या कार्यक्षम राहून, खोडात राखीव अन्नसाठा तयार होतो.

* काडीच्या डोळ्यामध्ये सशक्त घडांची निर्मिती होते

* खराब हवामानात, गैरमोसमी पाऊस, अति उष्णता यापासून संरक्षण होते.

* पाण्याचा ताण द्राक्षवेली सहन करू शकतात.

* पाने मोठी, जाड, रुंद व सतेज बनतात.

* काडी एकसारखी, भरपूर व रशरशीत निघते.

* काडी पूर्ण व लवकर पिकली जाते.

* काडीचे डोळे उत्पादनक्षम बनतात.

* १०० % सबकेन शेंडा चालतो

* वेलीचे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

* खरड छाटणी उशीरा घेतली तरी काडी पूर्ण तयार होते.
दिवस   नत्र   स्फुरद   पालाश   Mgso4   सेंद्रिय खत  
१ - ३०   ७२   ६०   -   -   -  
३१ - ६०   २४   ९०   १९   २३   (१५० कि . कल्पतरू खत)  
६१ - ९०   -   ६०   ५६   २२   (१५० कि . कल्पतरू खत)  
९१ -१२०   -   -   १९   -   (१५० कि . कल्पतरू खत)  
टिप :वरील खत माती परिक्षण करूनच धावे. परीक्षणानुसार खताचा वापरामध्ये बदल करावा.

सबकेन : एप्रिल छाटणीनंतर आलेल्या फुटींची संख्या कमी असल्यास किंवा वाढ एकसारखी नसल्यास सबकेन करणे योग्य असून ते पाण्याच्या उपलब्धतेनुसार ठरवावे. पाणी कमी असल्यास (एप्रिल - मे) सबकेन करणे टाळावे.

अशावेळी मेनकेनवर काड्यांची संख्या ठरवावी.

सबकेन करण्यासाठी वेलीवरील जोमदार फुटी ६ पानांवर येताच शेंडा खुडावा. सबकेन करताना एकूण काड्यांपैकी निम्म्याच काड्या ठेवाव्यात. सबकेन झाल्यानंतर खरड छाटणीनंतर लिहोसीन, ६ बी. ए., युरॅसिल, थ्राईवर, क्रॉंपशाईनरच्या फवारणीमुळे गर्भधारणा व्यवस्थित होते, तसेच एप्रिल छाटणीनंतर वेळापत्रकाप्रमाणे फवारण्या घेतल्यावर वेलीमध्ये राखीव अन्नसाठा तयार होतो.

खरड छाटणीनंतर १५ ते २० दिवसात सबकेन फुटते व छाटणीनंतर ६५ ते ७० दिवसांत तयार होते. ऑक्टोबर छाटणीनंतर सबकेन वरील पोंगा जाड निघतो. सबकेन घडाचा जोर असतो. त्यामुळे सबकेन करणे गरजेचे असते.

ऑक्टोबर छाटणी वेळेवर किंवा अगोदर मिळण्यासाठी 'सबकेन' हे निर्यातीच्या दृष्टीने योग्य आहे.

परंतु आवश्यकता भासल्यावरच सबकेन करावी. त्यासाठी योग्य संजीवकाचा वापर करावा. जास्त प्रमाणात संजीवकाचा वापर केल्यास (Excessive hormones ) वाढतात. त्यामुळे संजीवकाचा वापर परिस्थिती असेल त्याचवेळीच करावा.

मेनकेन : मेनकेनवरील माल कमी व साधारण प्रतीचा मिळण्याची शक्यता असते, परंतु पाणी कमी असल्यास पर्यायाने मेनकेनवर माल धरावा लागतो.