चुनखडयुक्त बागेतील द्राक्ष १४२ रू/ ४ किलो दराने दुबईला निर्यात

श्री. पोपट निवृत्ती माळी, मु. पो. कोळे, ता. सांगोला, जि. सोलापूर.
मोबा ९९२३६६०३८७


सोनाका ६.५' x ४.५' वर ३० गुंठ्यामध्ये ४ - ५ वर्षापुर्वी लावला आहे आणि तास - ए - गणेश डॉंग्रीजवर १ एकरमध्ये २ वर्षापुर्वी लावला आहे. दोन्ही बागेची जमीन, मुरमाड, चुनखडयुक्त आहे. सोनाका बागेला डॉ.बावसकर तंत्रज्ञान ३ - ४ वर्षापासून वापरतो. सोनाकाची १५ मार्च ला एप्रिल छाटणी केली तेव्हा जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर वापरले. नंतर ऑक्टोबर छाटणी २१ ऑगस्टला केली. इलोंगेशनसाठी जर्मिनेटर २ मिलीची डिपींग घेतली आणि ४ - ५ फवारण्या डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या केल्या. तर माल डिसेंबरमध्येच (२००७) निघाला. रेसिड्यू निघाले नाही. माल मुंबई (वाशी) ला श्री. नारायण ठोसर यांच्याकडे १४२ रू/ ४ किलोप्रमाणे विकला. तेथून त्यांनी माल दुबईला निर्यात केला. वाशीचे दलाल श्री. नारायण ठोसर हे त्यांच्या गावी नारायणगाव (जुन्नर) ला स्वत: च्या द्राक्षावर गेली ७ - ८ वर्षापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत आहेत. सोनाकाचा एकून ८ टन माल निघाल, त्याचे साधारणपणे २ लाख रू. झाले.

तास - ए - गणेश युरोपसाठी

सध्या (४ फेब्रुवारी २००८) तास - ए - गणेश पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहे. हा बाग २ वर्षापुर्वी डॉंग्रीजवर लावला आहे. त्याचा तिसरा बहार असून एप्रिल छाटणी एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात तर ऑक्टोबर छाटणी १५ ऑक्टोबरला केली. या बागेचा माल युरोपसाठी तयार करायचा आहे. सोनाकाबद्दल डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा अनुभव आहेच. तरी खात्री करण्यासाठी तास - ए - गानेश मालामध्ये रेसिड्यू राहू नये यासाठी वापरण्यापुर्वी सरांचा सल्ला घेण्यासाठी आज आलो आहे.

सरांनी सांगितले की नाशिक, सांगली भागातील अनेक द्राक्ष बागायतदारांनी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने माल निर्यात केला आहे. ज्या बागांना अगोदर रासायनिक औषधे वापरून रेसिड्यू होते, ते ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीने गेले.

एका वेलीवर २५ घड आहेत . सरासरी २५० - ३०० ग्रॅम वजन मिळेल असे वाटत आहे आणि याला ३५ -४० रू. किलो भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. यावर सरांनी सांगितले, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा पुर्ण वापर केला तर घड ४५० ग्रॅमचा आणि जागेवर ५० - ५५ रू. किलो भाव मिळेल. त्यावरून सध्या पाणी उतरण्याची अवस्था असल्याने सरांनी थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३ लि. आणि राईपनर २ लि. ५०० लि. पाण्यातून फवारण्यास सांगितले, त्याचप्रमाणे ही औषधे वापरणार आहे. हा माल युरोपला पाठवायचा आहे.