७० - ८० % डावण्या हार्मोनीमुळे नियंत्रणात घडकुज संपुर्ण थांबली

श्री. सुरेश धोंडीराम मोरे, मु. पो. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली


क्षेत्र - ५ एकर, जात - सोनाका , थॉमसन

छाटणी तारीख - २० सप्टेंबर २०१०

छाटणीपासून ३० ते ६० दिवसात ७० ते ८० % डावण्याचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी आमच्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधींनी भेट दिली. त्याचे सल्ल्यानुसार त्यावेळी हार्मोनी औषधाचा वापर केला. ते वापरल्यानंतरचे रिझल्ट खूप चांगले मिळाले. घडांमध्ये डावण्याची बुरशी प्रत्येक घडामध्ये दिसत होती, ती हार्मोनी वापरल्यावर आटोक्यात येऊन हिरवटपणा चकाकू लागला. पाऊस पडल्यानंतर फ्लॉवरींग स्टेजमध्ये ३५ ते ४० दिवसाचे असताना दुसऱ्याच्या बागेत घड कुजू लागले. पण हार्मोनी वापरल्यावर आमच्या बागेत १% सुद्धा घड कुजले नाही. इतरांच्या बागेत फ्लॉवरींगमध्ये गळ भरपूर झाली. ढगाळ वातावरणाने इतरांच्या बागेत डावण्या फुलत असताना हार्मोनीमुळे आमच्या बागेत शेवटपर्यंत डावण्याचा प्रादुर्भाव झाला नाही.