डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीने द्राक्ष उत्पादन व दर्जात वाढ

श्री. गुलाबराव खंडेराव शिंदे, मु. पो. डोंगरगाव, ता. हवेली, जि. पुणे


द्राक्षावर डिपींगपर्यंत ८-८ दिवसाच्या अंतराने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ४ फवारण्या केल्या. त्यामुळे माल भरपूर लागला. घड गोलाकार व मणी एकसारखे, फुगीर, मोठ्या आकाराचे होते. या फवारणीमुळे दरवर्षी पेक्षा उत्पादनात वाढ झाली. तसेच कलर व गोडी असल्यामुळे विक्रीला चांगल्या भावात माल विकला गेला. दरवर्षी आम्हाला एकरी २५ टन मिळायचा, तो यावर्षी ३० - ३२ टनावर गेला.