संपूर्ण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे द्राक्ष बाग निरोगी उत्पन्न दर्जेदार

श्री. गोपीनाथ विष्णु कसबे, मु. पो. वडगांव, ता. जि. नाशिक.
मोबा. ९०११८९७६३०


माझ्याकडे असलेल्या १॥ एकर सोनाका द्राक्ष बागेची लागवड ५ वर्षापुर्वी ९' x ५' वर केलेली आहे. मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा फवारणी व डिपींगमधून वापर ऑक्टोबर छाटणीपासून केला.

सुरूवातीस बाग छाटल्यानंतर हायड्रोजन सायनामाईड (३० लि. पेस्ट) मध्ये जर्मिनेटर १ लि. चा वापर केल्यावर द्राक्षबाग एकसारखा फुटला. माझ्याबरोबर ज्यांनी द्राक्ष बाग छाटल्या होत्या, परंतु जर्मिनेटर च्या वापर केला नाही. त्यांच्या द्राक्ष बागा मागेपुढे फुटल्या. माझ्या द्राक्ष बागेत काही प्रमाणात जाड काड्या होत्या, त्यादेखील एकसारख्या व लवकर फुटल्या.

मागील वर्षी डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. नोव्हेंबरमध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे डाऊनीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. फवारणी पत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या हार्मोनीसह एकंदरीत ६ फवारण्या केल्या.

पोंग अवस्थेत असताना थ्राईवर १ लि., क्रॉंपशाईनर १ लि., न्युट्राटोन १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केल्यामुळे घडांना साईज मिळाली. घड जिरले नाही की गोळी झाली नाही. ढगाळ हवामान असताना देखील घड सक्षम निघाले. वरील फवारणीनंतर १० दिवसांनी थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + हार्मोनी ३०० मिली ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने पाने निरोगी, रूड व गर्द हिरवीगार झाली. परिसरात सर्वत्र डावणी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढला होता. परंतु माझ्या द्राक्षबागेवर थ्राइवर, क्रॉंपशाईनरसोबत हार्मोनीचा वापर केल्यामुळे डावणी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव झाला नाही. बहुतांश द्राक्ष बागांवर घडांमध्ये डावणी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव झाला होता. माझ्या द्राक्षबागेवर पानांवर आलेला काही प्रमाणातील डावणी जागेवर थांबला. या फवारणीनंतर मध्ये सेक्टीन व मेडोड्यूओ या बुरशीनाशकांची स्वतंत्र फवारणी केली. पुढे प्रत्येक फवारणीमध्ये थ्राईवर, क्रॉंपशाईनरसोबत हार्मोनी चा वापर केल्यामुळे डावणी मिल्ड्यूबरोबरच काही प्रमाणात असणारे भुंगेरे, काळे थ्रिप्स मरतात हे जाणवले. पहिल्या डिपींगमध्ये हार्मोनी १॥ मिली + जर्मिनेटर ५ मिली/ लि. + जी. ए. + सायट्रिक अॅसिडचा वापर केल्यामुळे घडांवर काही प्रमाणत जाणवत असलेला डावणी पूर्णत: आटोक्यात आला. हार्मोनी डिपींगमधे वापरामुळे कुटल्याही प्रकारचे स्क्रोचींग अथवा डाग पडले नाही.

कल्पतरूमुळे मण्यांना लांबी व टनेज मिळते

फुलोरा अवस्थेत थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + हार्मोनी ३०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम ची २०० लि. पाण्यातून फवारणी केल्यामुळे करपा, डावणी मिल्ड्यू यावर प्रतिबंध होऊन कुजवा, मणीगळ झाली नाही. दुसर्‍या डिपींगमध्ये जी.ए. सोबत जर्मिनेटर ५ मिली + न्युट्राटोन ५ मिली / लि. प्रमाणे वापर केला. त्याचबरोबर सम्राट खतासोबत कल्पतरू सेंद्रिय खताच्या एकरी ६ बॅगा खालून दिल्या. त्यामुळे फुगवणी सोबत टनेज सापडण्यास मदत झाली. मण्यांना लांबी चांगली मिळाली. सोनाकावर सनबर्नचा अटॅक मोठा प्रमाणात होतो, तो जाणवला नाही. पावसाळी वातावरणात गळीत द्राक्षबाग सापडली होती. परंतु मणीगळ सुद्धा कमी झाली. खराब मण्यांचे प्रमाण फारच कमी होते. एकूण १॥ एकरमध्ये १५५ क्विंटल माल निघाला. २७०० ते २८०० रू./ क्विंटल असताना ३२०० रू./ क्विंटल मिळाला.